Fourteen-year-old Dr. Atharva Brand Ambassador
Fourteen-year-old Dr. Atharva Brand Ambassador 
पश्चिम महाराष्ट्र

चौदा वर्षाचा डॉ. अथर्व ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : आजपर्यंत सायकलींग, तायक्वॉंदो यासह अन्य स्पर्धामध्ये मध्ये तब्बल 21 सुवर्ण, 12 सिल्व्हर आणि 6 कास्यपदके मिळविलेला डॉ.अथर्व संदीप गोंधळीला रस्ता सुरक्षाचा "ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' बनला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात त्याला "ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' करून जानजागृती करण्याचा सन्मान दिला आहे. चौदा वर्षाचा अथर्व सायकलींग करून रस्ता सुरक्षा, इंधन बचाव, लेक वाचवा लेक वाढवा, निरोगी आरोग्याबाबत जनजागृती करणार आहे. 

डॉ. अथर्वने लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवले आहे. बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून त्याने विश्वविक्रम केला आहे. टोप संभापूर (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) येथील 14 वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्वने यापूर्वीही 245 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या 10 तासात पूर्ण केला आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई डॉ.मनिषा ,वडील डॉ.संदीप व शालेय शिक्षकांकडून घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीची दखल घेत द डायसेस ऑफ आशिया चेन्नई तामिळनाडू यांनी "डॉक्‍टरेट इन अँथलेटिक' ही पदवी चेन्नई येथे एफ एफ डब्ल्यू चे संचालक डॉ. चिझुको ऑन डेरा आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. पी.एम. इबेंन्जर यांच्या हस्ते देण्यात आली. लहान वयात स्पोर्टस मध्ये डॉक्‍टरेट इन अँथलेटिक ही पदवी मिळविणारा अथर्व हा पहिला भारतीय खेळाडू ठरला असल्याचे डॉ. गोंधळी यांनी सांगितले. त्याला यापूर्वी गजेंद्र हिरडे यांचे तर सध्या आयर्नमॅन आकाश कोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

अथर्वच्या या कामगिरीचा वापर त्याने रस्ता सुरक्षेसाठी करावा, यासाठी त्याला "ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' केले आहे. पेठवडगाव येथील होली मदर इंग्रजी माध्यम शाळेत शिकणारा अथर्व दररोज 170 किलोमीटर सायकल सराव करत आहे. या कालावधीत तो वाहतुकीचे नियम पाळावेत, यासह अन्य बाबींचे प्रबोधन करणार आहे. 
डॉ. स्टीव्हन अल्वारीस (प्रादेशिक परिवहन अधिकारी-कोल्हापूर) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT