NAL 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत बोगस पदोन्नत घेणाऱ्या संजय पवार यांना दणका 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः बोगस पदोन्नती घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या संजय पवार यांना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दणका दिला. त्यांची पदावणती करत आटपाडीतून तत्काळ शिराळ्याला बदली करण्यात आली. आटपाडी आणि मिरज येथून त्यांना आज दुपारीच कार्यमुक्त करण्याचे आदेश निघाले. 


संजय पवार पदोन्नती घोटाळ्यासह बुर्ली (ता. पलूस) येथील पाणीपुरवठा घोटाळ्यात अडकले आहेत. त्याविरुद्ध पलूस पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी याबाबतची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला आहे. 
संजय पवार हे मेस्त्री श्रेणी-1 म्हणून सेवेत होते. तेथून त्यांनी 2000 साली कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती घेतली. पुढील चार वर्षात म्हणजे 2004 पर्यंत त्यांनी तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण करावी, या अटीसह ही पदोन्नती दिली होती. ते परीक्षा उत्तीण झाले नाहीत. तरीही त्यांची पदोन्नती आजअखेर कायम राहिली होती. ही सपशेल फसवणूक होती.

या प्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या पदोन्नती घोटाळ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु आहे. आता पहिल्या टप्प्यात पवार यांना दणका देण्यात आला आहे. त्यांना आता स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर पदावनत करण्यात आले आहे. त्यांचा 2004 ते 2011 हा कालावधी मेस्त्री श्रेणी-1 असा गृहित धरला जाणार आहे. त्यानुसार त्यांचे वेतन निश्‍चित होईल. सन 2011 नंतर त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल होते. त्यामुळे तेथून पुढे कनिष्ठ अभियंता पदानुसार पेतनश्रेणी निश्‍चित होते. याशिवाय त्यांच्या नेमणुकीविषयी आणखी सविस्तर आदेश काढले आहेत. 


या आदेशानंतर आटपाडी पंचायत समितीच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी संजय पवार यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांना शिराळा पंचायत समितीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायकपदी नेमणूक देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT