Fraud by Zero Talathi in flood relief fund 
पश्चिम महाराष्ट्र

जमीन 'झिरो'... तरीही मारला डल्ला... कुठे?

सकाळवृत्तसेवा

शिराळा : पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) येथे तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या हणमंत नामदेव पवार याने जमीन नसताना पत्नीच्या नावावर 2.26 हेक्‍टर व आपल्या नावावर 1.05 हेक्‍टर चुकीचे क्षेत्र दाखवून 3.31 हेक्‍टर क्षेत्र अतिवृष्टी व पूरबाधित दाखवून 81 हजारांच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 40 हजार 500 रुपये वर्ग झालेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

शिराळा तालुक्‍यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराची स्थिती होती. शेतकरी व नागरिकांना नुकसानीबद्दल 20 कोटीची मदत जाहीर झाली आहे. त्यातील 17 कोटी 9 लाख रुपये बाधीतांच्या खात्यावर जमाही झालेत. शिराळा तालुक्‍यात सर्वच गावांना महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला होता. बाधित 95 गावांतील 24 हजार 846 शेतकऱ्यांचा त्यात समावेश होता. 8654.52 हेक्‍टर क्षेत्र बाधित होते. 3 हजार 241 शेतकरी कर्जदार, तर 21 हजार 607 बिगर कर्जदार आहेत.

या सर्वांच्या खात्यावर 17 कोटी 8 लाख 91 हजार 915 रुपये अनुदान जमा झाले. 
याच संधीचा फायदा पणुंब्रे वारूण येथे अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्याने उठवला. स्वतःच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना बनावट सातबारा, खाते उतारे तयार करून सादर केले. पत्नी व स्वतःच्या नावावर 3.31 हेक्‍टर क्षेत्र बाधित दाखवले. 81 हजार रुपये त्याला मंजूरही झालेत. हणमंतच्या खात्यावर 40 हजार 500 रुपये जमा झाल्याने व नावे जमीन नसताना यादीत नाव आल्याने बिंग फुटले. 

तलाठ्यांची चौकशी सुरू : शिंदे 
हणमंत नामदेव पवार याच्याबद्दल माझ्याकडे तक्रार आली आहे. त्याच्या नावावर जमा झालेले 40 हजार 500 रुपये वसूल करण्यात येणार आहेत. पत्नीच्या नावे पैसे अजून वर्ग झाले नाहीत. संबंधित तलाठ्याची चौकशी लावली आहे. पुढील कारवाई करू, असे शिराळा तहसिलदार गणेश शिंदे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT