corona 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत घरपोहोच मोफत ऑक्‍सिजनची सोय 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णाला गरजेनुसार घरपोहोच मोफत ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. येथील कोरोना रुग्ण साह्य आणि समन्वय समितीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकामी दहा पोर्टेबल मशीन खरेदी करण्यात आली असून त्यातून अनेकांचे प्राण वाचणार आहेत, असा विश्‍वास समितीचे सतीश साखळकर यांनी व्यक्त केला. 

कऱ्हाड येथे पद्धतीचा उपक्रम सुरु असल्याची माहिती समितीला "सकाळ'च्या बातमीतून समजली. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या. कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समितीने शहरातील दानशूर व्यक्तीना पोर्टेबल ऑक्‍सिजन मशीन देण्याचे आवाहन केलोहते. त्याला प्रतिसाद मिळाला. दानशूर व्यापारी बांधवानी 10 पोर्टेबल ऑक्‍सिजन मशीन दान केल्या. बुधवारी सायंकाळी 6 वाजता मशीन ताब्यात घेण्यात आल्या. त्याची सोशल मीडियातून चर्चा झाली आणि त्याच रात्री 12 वाजता पहिली मशीन देण्यात आली. पहाटे तीन वाजता एकाने मशीन नेले.

समितीतील इतर सदस्यांना रात्रीपासून प्रचंड फोन येत होते. सकाळी सर्व सदस्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर त्या मशीन सुपुर्द करण्यात आल्या. अशा पद्धतीने रुग्णांवरील संकट दूर करण्यात हातभार लागल्याचे समाधान साखळकर यांनी व्यक्त केले. आता ही चळवळ बनावी, ऑक्‍सिजन पुरवणारी एक साखळी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळे उपक्रम साजरे करणारे मंडळे, व्यापारी बांधव, उद्योगपती, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


या मशीनसाठी साखळकर यांच्यासह उत्तम साखळकर, अभिजित भोसले, महेश खरडे, ज्योती आदाटे, प्रशांत भोसले, लालू मेस्त्री, तानाजी रुईकर, जयंत जाधव, सनी धोत्रे, प्रदीप कांबळे, अमर निंबाळकर, राहूल पाटील, धनंजय वाघ, अश्रफ वांकर, मकसूद भादी, स्वप्नित खोत, रवी खराडे, अविनाश जाधव, आनंद देसाई यांच्याशी संपर्क साधावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT