future of residence school students face problem in belgaum
future of residence school students face problem in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात वसती शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच

मिलिंद देसाई

बेळगाव : राज्यातील विविध वसती शाळांमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी अद्याप परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी असुन परीक्षा घेण्याचा निर्णय लवकर घेणे आवश्‍यक आहे. अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधुन जोर धरु लागली आहे. 

राज्यात मुरारजी देसाई, संगोळी रायन्ना वसती, कित्तुर चन्नम्मा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदीरा गांधी, एकलव्य या नावाने 525 वसती शाळा आहेत. या ठिकाणी मागासवर्गीय, आर्थिक मागास व इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. वसती शाळेत चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या जेवणाची सोय केली जाते. यासह संगणक शिक्षण, विविध खेळांचे प्रशिक्षणही देण्यात येते. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीही देण्यात येते.

त्यामुळे वस्ती शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरु असते. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व वसती शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येणाऱ्या काळात वसती शाळा सुरु होणार की नाही याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. तसेच 2020 - 21 च्या शैक्षणिक वर्षासाठी अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात झालेली नाही. 

वसती शाळांमध्ये प्रवेशासाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकार (केईटी) तर्फे परीक्षा घेतली जाते. यावर्षी सहावीत प्रवेश देण्यासाठी 11 मार्च पासुन अधिसुचना जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला चालना मिळु शकलेली नाही. दरवर्षी प्रवेश प्रक्रियेची घोषणा होताच राज्यभरातुन दीड लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल होतात. 

राज्यात 402 मुरारजी देसाई वसती शाळा, 115 कित्तुर राणी चन्नम्मा तर एकलव्य आणि अटल बिहारी वायपेयी यांच्या नावाने प्रत्येकी 4 शाळा आहेत. या शाळांमध्ये 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असुन वसती शाळा चांगल्या प्रकारे चालाव्यात यासाठी राज्य सरकारच्या कर्नाटक वसती शिक्षण संस्थेतर्फे विविध उपक्रम हाती घेतले जातात. 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT