sangli latest political update
sangli latest political update 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली अर्बन बॅंकेत सत्ताधारी गाडगीळ पॅनेलचा एकतर्फी विजय

विष्णू मोहिते

या निवडणुकीत बापूसाहेब पुजारी पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे.

सांगली - सांगली अर्बन बॅंकत सलग दुसऱ्यांदा विद्यमान सत्ताधारी गटाचे स्व. अणासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने वर्चस्व मिळवले. १६ जागांवर एकतर्फी विजय मिळवला. विरोधी बापुसाहेब पुजारी बॅंक बचाओ पॅनेलचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी गाडगीळ पॅनेलला दहा हजार तर विरोधी पुजारी पॅनेलला अडीच हजारच्या दरम्यान मते मिळाली. सत्ताधारी गटाचे डॉ. रविद्र आरळी यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. सत्ताधारी गटाने विजय स्वष्ट झाल्यानंतर जल्लोष साजरा केला. सांगली शहरातून मिरवणूक काढली. (Sangli News)

बॅंकेसाठी मिरज येथील शेतकरी भवनात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाला साडेतीन हजार विरोधी गटाला पाचशे ते सातशे, दुसऱ्या फेरीत सत्ताधारी गटाला सात हजार विरोधकांना दोन हजार तर तिसऱ्या फेरीत सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना दहा ते सव्वादहा हजार तर विरोधी गटाला अडीच ते दोन हजार सहाशे मते मिळाली. सत्ताधारी गटाचे सर्व म्हणजे १६ उमेदवार विजयी झाले.

साडेतीन वाजल्यानंतर सत्ताधारी गटाला विजय निश्‍चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, आमदार गाडगीळ, शेखर इनामदार आदी कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल फेरी काढली.

बॅंकेसाठी गेली दहा दिवस प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाले. ६० हजार ३३ मतदान असतानाही केवळ २१.५३ टक्के मतदान झाले. सांगली जिल्ह्याबाहेर अत्यल्प मतदान झाले होते. मतदानादिवशी रविवारी पाऊस असल्यानेही मतदान कमी झाले होते. बॅंकेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात आहे.

बॅंकेचे ६० हजार सभासद, ३५ शाखा आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उदगीर, कुर्डुवाडी, बार्शी, माजलगाव, परतुर, उडीदरा, वसमत, मानवत आदींचा समावेश आहे. सांगली शहरात ३३ टक्के, जिल्ह्यात ३३ टक्के, उर्वरित जिल्ह्यांत ३४ टक्के मतदार आहेत. बॅंकेचा ‘एनपीए’, खरा ‘एनपीए’, शाखाविस्तार, छोटे आणि मोठे कर्जदार, बॅंक प्रगती, दिलेली मोठी कर्जे याबाबत दोन्ही पॅनेलकडून आरोप-प्रत्यारोप झाले.

सत्ताधारी पॅनेलचेविजयी उमेदवार असे- गणेशराव गाडगीळ, अनंत मानवी, हणमंतराव पाटील, डॉ. रवींद्र आरळी (बिनविरोध), श्रीपाद खिरे, श्रीकांत देशपांडे, संजय पाटील, शैलेद्र तेलंग, संजय धामणगावकर, सागर घोंगडे, रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, सत्यनारायण उर्फ सतीश मालू, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, अश्‍विनी आठवले, स्वाती करंदीकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT