ganesh festival in satara
ganesh festival in satara 
पश्चिम महाराष्ट्र

फर्जद, 26/11 अन्‌ पत्री सरकार! 

सकाळवृत्तसेवा

सातारा : आमची कोणाशी स्पर्धा नाही, असे म्हणत साताऱ्यातील सजीव देखाव्यांची परंपरा जोपासणाऱ्या प्रमुख गणेश मंडळांनी या वर्षी परंपरा कायम ठेवली आहे. पन्हाळा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे कोंडाजी फर्जद, हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे कर्तृत्व, बाहुबली, सर्जिकल स्ट्राइक, गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप, स्वच्छता अभियान... असे विषय त्यांनी हाताळले आहेत. सध्या या देखाव्यांच्या रंगीत तालमी सुरू आहेत. 

साताऱ्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी सजीव देखाव्यांबरोबरच काही मंडळांनी हालते देखावे सादर करण्याची परंपरा जोपासली आहे. यंदा शहरातील प्रमुख आठ-दहा मंडळांनी सजीव देखाव्यांच्या माध्यमातून करमणुकीवर भर दिला आहे. कोंडाजी फर्जद या मावळ्याने मुठभर मावळ्यांसह गनिमी कावा करून पन्हाळा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. हा सुमारे 20 मिनिटांचा देखावा शनिवार पेठेतील राजकमल गजाननोत्सव मंडळ करत आहे. सोमवार पेठेतील अजिंक्‍य गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांच्या चुकीच्या सवयींवर बोट ठेवत संदेश देणार आहेत. 

सुमारे 15 मिनिटांच्या या देखाव्यात 30 कलावंतांचा सहभाग असेल. सोमवार पेठेतील गजराज गणेशोत्सव मंडळ पोलिसांची व्यथा मांडणार आहे. त्याला मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याची पार्श्‍वभूमी असेल. सुमारे 40 फूट उंचीची ताज हॉटेलची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. शिवाय कोर्ट हॉल, पोलिस कर्मचाऱ्याचे घर उभे करण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार उभे केले. या ऐतिहासिक घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समर्थ मंदिर येथील समर्थ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृती जागविणार आहेत. क्रांतिसिंह यांना अभिप्रेत स्वातंत्र्य काय आहे आणि आज त्याची परिस्थिती, हे प्रसंग पाहणाऱ्यासारखे असतील. सुमारे 15 मिनिटांच्या या देखाव्यात मंडळाचे 25 कार्यकर्ते सहभागी असणार आहेत. 

"बालविकास' देणार जवानांना मानवंदना 
भव्य-दिव्यता ही ख्याती असलेले शनिवार पेठेतील बालविकास गणेशोत्सव मंडळ हिमालयाची प्रतिकृती, युद्धाचा प्रसंग तसेच राष्ट्रभक्तिपर गाण्यांचा खुबीने वापर करून देशाच्या संरक्षणात कामी आलेल्या जवानांना मानवंदना देणार आहेत. मंडळाचे सुमारे 80 कलावंत या देखाव्यात असतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT