पश्चिम महाराष्ट्र

रेशनिंगवर धान्य घ्या... बक्षीस मिळवा! 

हेमंत पवार

कऱ्हाड - रेशनिंगच्या धान्य वितरणाची व्यवस्था संगणकावर आधारित आधार कार्डशी संलग्न पॉस मशिनव्दारे सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भात जागरुकता कमी असल्याचे शासनाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येते. त्यामुळे पॉस मशिनव्दारे धान्य आणि त्याव्दारे निघणारी पावती घेण्याची ग्राहकांना सवय लागावी आणि पर्यायाने दुकानदारास पावती देणे बंधनकारक व्हावे, यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक आणि दुकानदार यांच्यासाठी बक्षीस योजना राबवण्यात येणार आहे.

रेशनिंग दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने पारदर्शक कारभारासाठी संगणकावर आधारित आधार कार्डशी संलग्न पॉस मशिनव्दारे धान्य वाटपाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यातून आता पारदर्शकता येताना दिसते. मात्र, ग्रामीण भागात या मशिनला रेंज नसल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने काही दुकानदारांकडून मशिन वापरण्याबाबत चालढकलपणा करण्यात येत असल्याचे शासनाने केलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित पॉस मशिनचा १०० टक्के वापर सध्या होताना दिसत नाही. या मशिनचा वापर वाढून कारभारात पूर्णतः पारदर्शकता यावी, या हेतूने शासनाने आता पॉस मशिनव्दारे धान्य आणि त्याव्दारे निघणारी पावती घेण्याची ग्राहकांना सवय लागावी आणि पर्यायाने दुकानदारास पावती देणे बंधनकारक व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक आणि दुकानदारांसाठी बक्षीस योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पॉस मशिनव्दारे १०० टक्के धान्य वितरण करणारी दुकाने आणि त्या दुकानातील लाभार्थी या बक्षीस योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यात १०० टक्के पॉस मशिनवर धान्य वितरण करणारी जास्त दुकाने असल्यास रास्त भाव दुकानांच्या १२ अंकी क्रमांकाच्या आधारे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या प्रणालीव्दारे सोडत काढून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची संमती आवश्‍यक 
जिल्हा पातळीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून संबंधित बक्षीस योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानातील एक, तालुका आणि जिल्ह्यातून एका ग्राहकाला, तर जिल्हा पातळीवर एका दुकानदाराला वस्तूच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. त्या बक्षिसांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांच्या संमतीनंतरच पुढील  कार्यवाही होणार आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT