पश्चिम महाराष्ट्र

गोकुळ सभा तीन मिनीटात गुंडाळली

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर  - जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेली गोकूळ दूध संघाची सर्वसाधरण सभा सत्ताधारी-विरोधक आमने-सामने भिडल्याने अवघ्या तीन मिनिटात गुंडळण्यात आली.

सत्ताधारी व विरोधी गटाच्या प्रचंड घोषणाबाजीत ही सभा संपवण्यात आली. लोकशाही पध्दतीने ही सभा होवून मल्टीस्टेटचा ठराव मंजूर झाल्याचे महाडिक यांनी जाहीर केले. तर प्रचंड बहुमताने मल्टीस्टेटचा ठराव ना मंजूर झाल्याचे विरोधी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. 

गोकुळची आज सर्वसाधारण सभा ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात आयोजित केली होती. मल्टीस्टेटचा ठराव येणार असल्याने ही सभा पहिल्यापासूनच वादळी होणार याचा अंदाज सर्व जिल्ह्याला होता.

विरोधक येईपर्यंत सभागृहाचा 70 टक्‍के भाग व्यापलाने विरोधकांना बसण्यासाठी सभागृहाच्या शेवटी जागा ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुढे जागा देण्याची मागणी करत विरोधकांनी प्रवेशदवार आडवून ठेवले होते. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने 10 वाजून 50 मिनिटांनी विरोधक सभागृहात आले. विरोधी गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार चंद्रदीप नरके यांनी थेट स्टेजकडेच कूच केल्याने सत्ताधाऱ्यांची गडबड सुरु झाली. सभासद, नेते अशा सर्वांचाच दंगा सुरु झाला. 

विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून चेअरमननी ठराव नंबर एक असे म्हंटल्यानंतर समर्थकांकडून मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर अशा घोषणा देण्यात आल्या. अशाच पध्दतीने ठराव क्रमांक दोन, तीन करत ठराव क्रमांक 12 संघ मल्टीस्टेट करण्याचा ठरावही असाच उच्चारण्यात आला. त्याला सत्ताधाऱ्यांनी समर्थन तर विरोधकांनी विरोध दर्शवला. हा सर्व प्रकार तीन मिनीटात घडला आणि राष्ट्रगीत म्हणून ही सभा गुंडाळण्यात आली. 

भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने व पोलिसांच्या सहकार्यामुळे गोकुळच्या सत्ताधारी गटाने बोगस सभासद ठराव धारक सभेत घुसवले आहेत

- आमदार हसन मुश्रीफ 

समांतर सभा

गोकुळ मल्टिस्टेट विरोधात कायदेशीर लढाई करण्याचा निर्धार बचाव कृती समितीच्या समांतर सभेत करण्यात आला. 'ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है' असा इशारा यावेळी देण्यात आला. मल्टीस्टेटच्या विरोधातील ठरावांच्या नोंदी रजिस्टरमध्ये करण्यात आल्या. गोकुळ सभेत घुसून मल्टिस्टेट ठरावाला विरोध केल्यानंतर पितळी गणपती चौकात समांतर सभा झाली.

संबंघीत बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT