Good news: Chief Minister Thackeray told Rohit Pawar a job-filled offline
Good news: Chief Minister Thackeray told Rohit Pawar a job-filled offline 
पश्चिम महाराष्ट्र

खुशखबरः नोकरभरती अॉफलाईनच, मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांना शब्द

सकाळ वृत्तसेवा

नगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचा अॉनलाईन नोकरभरती प्रक्रियेस विरोध आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पोर्टलद्वारे भरती करण्यात आली होती. त्यात घोटाळा असल्याचा संशय आहे. त्यामुळे चांगल्या उमेदवारांवर अन्याय होतो, असे अनेकांचे मत आहे. रोहीत पवार यांनी या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत हा प्रश्न कानावर घातला.

लवकरच महारभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि ‘एमपीएससी’च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. आपल्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलल्याचेही रोहीत पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात.

आमदार पवार फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात,  महापोर्टल’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव आहे. राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.  ते म्हणाले, “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल.”

मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितल्याचीही माहिती पोस्टमध्ये लिहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT