पश्चिम महाराष्ट्र

शासनाने बाजार समितीच्या माध्यमातून चारा डेपो सुरु करावेत

मार्तंड बुचुडे

पारनेर - तालुक्यातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगाम धोक्यात आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे  तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तातडीने चारा डेपो सुरु करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे..

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की चालू वर्षी पारनेर तालुक्यात दुष्काळी संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील बाजरी, तूर, कांदा, मूग यांच्यासह इतर पिकांची पेरणी वाया गेली आहे. तर दुसरीकडे तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलेला आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. म्हूणून बाजार समितीच्या माध्यमातून पारनेर शहरासह भाळवणी, टाकळी ढोकेश्वर व निघोज येथील ऊपबाजार समिती स्वमालकीच्या जागा आहेत  या जागांमध्ये चारा डेपो तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. 

दुष्काळी परीसरात जनावरांच्या चारा बरोबर  पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने मागेल त्याला टॅंकर अशी योजना ठिकठिकाणी सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वरे केली आहे. अशा अशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या बरोबरच प्रांताअधिकारी, तहसीलदार पारनेर यांच्यासह जिल्हा ऊपनिबंधक व सहाय्यक निबंधक पारनेर यांनाही सभापती गायकवाड यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT