government will not do injustice to rickshaw and goods transporters devendra fadnavis Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : रिक्षा, माल वाहतूकदारांवर सरकार अन्याय करणार नाही - देवेंद्र फडणवीस

Rickshaw RTO Passing : रिक्षा आणि माल वाहतूक वाहनांना परवाना नूतनीकरण विलंब शुल्क अन्यायकारक आहे. तो सरकारने रद्द करावा, अशी विनंती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : रिक्षा आणि माल वाहतूक वाहनांना परवाना नूतनीकरण विलंब शुल्क अन्यायकारक आहे. तो सरकारने रद्द करावा, अशी विनंती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी ‘सरकार या घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, लवकरच न्याय निर्णय घेतला जाईल,’ अशी ग्वाही दिली.

सांगली जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे पृथ्वीराज पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. विधानभवनात उपमुख्यमंत्री कार्यालयात ही भेट झाली. पृथ्वीराज यांनी परवाना नूतनीकरण शुल्काने रिक्षा व वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रिक्षाचालक-मालक हा सामान्य कुटुंबातील घटक आहे.

त्याचे हातावर पोट आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घर खर्च याचा ताळमेळ घालताना या घटकाची सातत्याने ओढाताण होत आली आहे. या घटकांना रिक्षा परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास दर दिवसाचा पन्नास रुपये दंड आकारला गेला आहे. तो रिक्षाचालकांना परवडणारा नसून त्यांचा संसार अडचणीत येईल.

दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांनी आयुष्यभर रिक्षाचालकांसाठी संघर्ष केला. या घटकांवर अन्याय होत असताना ते रस्त्यावर उतरले. रिक्षाचालक-मालकांबाबत अयोग्य निर्णय होऊ नये, अशी सगळ्यांची भावना आहे, अशी विनंती श्री. पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करत आहे. रिक्षाचालकांची या करातून सुटका करून देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. अतिरिक्त शुल्क माफ करण्याबाबत सरकार पावले उचलेल.

रिक्षाप्रश्‍नांवर सविस्तर बैठक

पृथ्वीराज पवार यांनी रिक्षा व्यवसायात वाढत निघालेल्या अडचणी आणि या घटकांची होत असलेली कोंडी लक्षात घेता नवे धोरण राबवण्याची गरज असल्याचे श्री. फडणवीस यांना सांगितले. या विषयावर लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित बैठक घेऊ, असे आव्हासन श्री. फडणवीस यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT