devendra phadanvis 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाच्या आपत्तीबाबत सरकार आणि मंत्री गंभीर नाहीत; देवेंद्र फडणवीस यांची टीका ; सांगलीच्या मृत्यूदराची जबाबदारी प्रशासनावर ढकलू नका 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाच्या आपत्तीबाबत सरकार आणि मंत्री गंभीर नाहीत अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगली जिल्ह्याचा कोरोनाचा 4.1 मृत्यूदर राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक आहे याबद्दल चिंता व्यक्त करतानाच लोकप्रतिनिधी केवळ प्रशासनावर दोष टाकून जबाबदारी झटकू शकत नाहीत असा टोलाही त्यांनी लावला. 

श्री फडणवीस कालपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,"" सांगली जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. त्यासाठी व्हेंटीलेटरसह खाटांची संख्या वाढवली पाहिजे. संसर्गाचे प्रमाण 16 टक्के इतके आहे. मृत्यूदर आणखी खाली आणण्यासाठी युध्दपातळीवर काम करावे लागेल. चाचण्या वाढवाव्या लागतील. 72 तासांपर्यंत चाचण्यांचे अहवाल येत नाही. त्यामुळे संसर्ग वाढतोय. ही जबाबदारी सामुहिक आहे. लोकप्रतिनिधी केवळ प्रशासनावर जबाबदारी टाकू शकत नाही. सर्वाधिक अडचण निधीची आहे. महापालिकेने हॉस्पिटल सुरु केले. पण त्यासाठी शासन निधी देत नाही. हे अनेक बाबतीत आहे.'' 


ते म्हणाले,"" जनआरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात अनेक अडथळे आहेत. या रुग्णालय आणि रुग्ण अशा दोघांच्याही बाजू आहेत. रुग्णालयांचे म्हणणे आहे की त्यांना पैसे मिळत नाहीत. शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणारी औषधे खासगी रुग्णालयात मात्र पैसे देऊन घ्यावी लागतात. सहा डोसची किंमती 35 हजार आहे. गरज असलेल्या रुग्णांना ही औषधे मिळाली नाहीत तर मृत्यूदर वाढतो. याबाबत मी मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.'' 


दारु दुकानांप्रमाणे इथेही उत्साह दाखवा 
श्री फडणवीस म्हणाले,"" दारु दुकाने सुरु करण्यासाठी जेवढा सरकारने उत्साह दाखवला तेवढा धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबतही दाखवावा अशी जनतेची अपेक्षा आहे.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT