पश्चिम महाराष्ट्र

ग्रेड सेपरेटरच्या कामास गती, डांबरीकरण लवकरच ; पाऊस उघडण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : येथील पोवई नाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाने आता गती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चारी बाजूने तसेच राजपथाकडील वाहतूक सध्या सुरू होत आहे. पाऊस उघडल्यानंतर या रस्त्यांवरून खडीकरण, डांबरीकरण केले जाणार असून, त्यामुळे सातारकरांची बहुतांश कोंडी सुटण्यास मदत होईल. मात्र, मोनार्क ते महाराज हॉटेल रस्त्यावरील ताण आणखी वाढणार आहे. 
 

सातारा शहराच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणारे पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होवून सुमारे दीड वर्ष उलटले आहे. नाक्‍यावर येणारे आठ रस्ते असून, तेथे खोदाई करण्यात आल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. सध्या बस स्थानक आणि राजपथ, कास रस्त्याच्या बाजूकडील भुयारी मार्गाचे काम झाले असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवतालचा तसेच महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या समोरचा भाग मुरमाने भरून घेतलेला आहे. त्यामुळे येथून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, पावसामुळे हा भराव थोड्याबहुत प्रमाणात खचला असल्याने वाहनचालकांची वाहने चालवताना त्रेधातिरपिट होत आहे. शिवाय, कऱ्हाड, कोरेगाव रस्त्याकडील काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाड, कोरेगाव बाजूने होणारी वाहतूक अजूनही अडचणीची ठरताना दिसत आहे. पाऊस थांबल्यानंतर भुयारी रस्त्यांचे काम पूर्ण झालेल्या बस स्थानक आणि कास रस्त्यांवर खडीकरण व डांबरीकरण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीने केले आहे. तसे केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. 


शिवपुतळ्यासाठी एक कोटी 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटींचा निधी प्रस्तावित आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरणही होणार आहे. 


चालायचं कोठून ? 

यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, छत्रपती शिवाजी महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच नागरिकांना चालत बस स्थानकाकडे जावे लागते. सध्या रजतसागर कॉम्प्लेक्‍सच्या बाजूने कऱ्हाड रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने तो आता पायी चालण्यासाठीही पूर्णत: बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत पोस्ट व बीएसएनएल कार्यालयाकडून विद्यार्थी, नागरिक ये-जा करत आहेत. मात्र, तेथे अनेक टपऱ्या उभ्या असून, त्यातून चालणेही मुश्‍किल होत आहे. शेकडो विद्यार्थी त्या रस्त्यावरून ये-जा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने त्या फुटपाथवरील खोकी हलवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT