gram panchayat results atmosphere sangli tasgaon 
पश्चिम महाराष्ट्र

'मी' कोणाचा? गुलाल लागलेले उमेदवार गोंधळात

सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. सोशल मिडियात चर्चेचा एकच हलकल्लोळ उठला. तो इतका वाढला, की निवडून आलेल्यांनाच समजेना मी नक्की कोणत्या पक्षातून निवडून आलो ? बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीही आमच्याच असे दावे प्रतिदावेही करण्यात येत होते. तालुक्‍यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहिर होऊ लागले आणि सुरू झाला प्रचंड आनंदोत्सव.

समाजमाध्यमात त्याला अक्षरशः उधाण आले. आपल्या पक्षाला किती ग्रामपंचायती लागल्या हे सांगण्याची जणू अहमहमिका लागली. तालुक्‍यात दोनच पक्ष एक आबा आणि दुसरा काकांचा. आबांच्या गटाच्या जादा ग्रामपंचायती आल्या का काकांच्या हे सांगण्याची स्पर्धाच लागली होती. 

सुरुवातीला एका गटाच्या ग्रामपंचायती जादा आल्याचे झळकताच मागे राहतील ते कार्यकर्ते कसले. त्यांनीही आमच्या गटाच्या जादा कशा आल्या हे सांगण्यासाठी यादीच दिली. त्यावर कढी म्हणून तशीच दुसरी यादी पसरण्यास सुरुवात झाली. स्पर्धा इतकी टोकाला गेली, की बिनविरोध ग्रामपंचायतीपण आमच्याच आहेत हे त्या यादीत सांगण्यास सुरवात झाली. निवडून येणारे आनंदात आहेत तोपर्यंत ते आमच्या गटाचे आणि पक्षाचे असे जाहीर करण्याची स्पर्धाच दिसली.

बरं. या पोस्ट इतक्‍या वेगाने पसरवल्या गेल्या की एकाच ग्रुपवर एकावेळी एकच पोस्ट एका मिनिटात पाच सात वेळा टाकली गेली. आली पोस्ट की पाठव पुढे. निवडून आलेल्यांना स्वतः फोन करून सांगावे लागत होते, की "बाबा मी अमुक नेत्याला मानतो. गैरसमज नसावा!' आपण नक्की कोणत्या गटातून निवडून आलो हे सांगण्यासाठी शपथ घायची वेळ ट्रोलर्सनी आणली होती.  

संपादन- अर्चना बनगे


 
 

.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT