पश्चिम महाराष्ट्र

पन्हाळा तालुक्यात चार सेंद्रिय शेती गटांना ‘ग्रीन सर्टिफिकेट’

सागर चौगले

माजगाव - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आरोग्यपूर्ण सकस अन्नधान्य, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित व्हावा, ग्राहकांना सेंद्रिय शेतीमाल मिळावा. यासाठी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा परंपरागत कृषी विकास योजनेची दोन वर्षांपूर्वी सुरवात झाली. त्यातीलच एक अंतिम टप्प्यातील ग्रीन सर्टिफिकेशनचा महत्वाचा भाग पन्हाळा तालुक्‍यातील चारही सेंद्रिय गटांनी पूर्ण केला असून त्यांना सेंद्रिय प्रमाणिकरण प्रक्रियेंतर्गत ग्रीन सर्टीफिकेट प्रदान करण्यात आले आहे. 

या योजनेमधून पन्हाळा तालुक्‍यात प्रत्येकी ५० एकर क्षेत्राचे असे एकूण चार शेतकरी गट स्थापन झाले आहेत. या चार गटांच्या माध्यमातून तालुक्‍यातील दोनशे एकर क्षेत्र सेंद्रियखाली आले आहे. 

तीन वर्षांच्या योजनेद्वारे सहभागिता हमी पद्धतीने शेतकरी गटाच्या शेतजमिनीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करुन देण्यात येणार आहे. कासारी खोरे सेंद्रिय शेती गट (बाजार भोगाव), मोताईदेवी गट (वारणूळ), सह्याद्री गट (आळवे) आणि श्री ज्योतिर्लिंग गट (केखले) या चार गटांची पीजीएस सेंद्रिय प्रमाणिकरणाकडे वाटचाल सुरू आहे. परंपरागत कृषी विकास योजनेत सहभागी होण्यामागे सेंद्रिय शेतीमधील जिज्ञासा कारणीभूत ठरली. प्रामाणिक हेतूने सेंद्रिय शेती केली तर उत्पादन खर्चात बचत तर होतेच शिवाय उत्पादित मालाचा दर्जाही सुधारतो, असे ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती उत्पादन (केखले) प्रक्रिया गटाचे उपाध्यक्ष राहुल घेवारी यांनी सांगितले.

आमच्या चारही सेंद्रिय शेती गटांचा व्यावसायिक उद्देशाने सेंद्रिय शेती करण्याकडे कल आहे. परंपरागत कृषी विकास योजनेतील प्रत्येक बाबींची या गटांनी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली आहे.
- पराग परीट,
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,  कृषी विभाग, पन्हाळा 

पन्हाळा तालुक्‍यात असलेली हवामानाची, पिकांची, जमिनीची वैविध्यता आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रामाणिक धडपड, यामुळे तालुक्‍यात सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 
- बंडा बापू कुंभार,
तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

Marathi Live Updates News: वारजेतील वडापाव सेंटरसह हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik Rail Protest: पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी ९ ऑगस्टला आळेफाट्यावर चक्काजाम; पक्षनिरपेक्ष जनआंदोलनाची हाक

SCROLL FOR NEXT