hand sanitizer manufactured by Vasantdada Sugar Factory
hand sanitizer manufactured by Vasantdada Sugar Factory 
पश्चिम महाराष्ट्र

या कारखान्याने बनवले सॅनिटायझर

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली. 99 टक्‍के प्युअरिटीचे अल्कोहोल असलेले जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तयार झालेले महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर आहे. "आय एम टीम विशाल' या नावाने ते बाजारात आणले आहे.

कोरोनाचा प्रसार वाढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यात निर्माण होत असलेल्या अल्कोहोलपासून सॅनिटायझर निर्मिती करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तातडीने सॅनिटायझर निर्माण करण्याबाबत निर्णय घेतला. 

वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये गुरुवारपासून सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ झाला. अर्धा लिटर ते पाच लिटर बाटलीमध्ये सॅनिटायझर बनवले जात आहे. आज पहिली बॅच बाहेर पडली. "आय एम टीम विशाल' या नावाने ब्रॅन्ड बनला असून "जॉईन टीम विशाल' असे आवाहन बाटलीवरील स्टीकरवर केले आहे. विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे या सॅनिटायझरचे मोफत वितरण केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी प्रतिष्ठानने यंत्रणा उभारली आहे. दररोज पाचशे बाटल्या उत्पादित केल्यानंतर त्याचे जिल्हाभर वितरण केले जाणार आहे. 

नागरिकांना मोफत वितरण

कोरोनाचा प्रसार रोखला जाण्यासाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता सॅनिटायझर बनवले जात आहे. त्याचे नागरिकांना मोफत वितरण केले जाणार आहे. 
- विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT