tung maruti.jpg
tung maruti.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

संकटमोचन हनुमानाचा जन्मोत्सव साधेपणाने साजरा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान' अशा गजराविनाच आज महाबली हनुमान जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. संकट मोचन हनुमानाच्या जन्मोत्सवावर "कोरोना' चे सावट असल्यामुळे सांगली परिसर आणि उपनगरातील यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. सर्वत्र साधेपणानेच जयंती साजरी केली. 


"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाऊन' करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. त्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणापैकी मंदिरे, मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. नुकतेच राम नवमी, महावीर जयंती घरातून आणि केवळ सोशल मिडियावर शुभेच्छा देऊन साजरी करण्यात आली. त्याच प्रमाणे हनुमान जयंतीवर देखील "कोरोना' चे सावट होते. 


प्रतिवर्षी हनुमान जन्मोत्सव सांगली परिसर आणि उपनगरातील हनुमान मंदिरामध्ये उत्साहाने साजरा होतो. जन्मोत्सवाचा पाळणा होऊन सुंठवडा वाटप केला जातो. तसेच हनुमान जयंतीनिमित्त काही ठिकाणी लोखंडी काहिलीमध्ये गव्हाची खिर बनवली जाते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. परंतू कोरोनामुळे ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात आज सकाळी पुजारी आणि मोजके भक्त यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून जन्मकाळ सोहळा साजरा केला. त्यानंतर भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यामुळे मंदिराबाहेरून जाणारे भक्त दुरूनच नमस्कार करून पुढे जाताना दिसले. 
हनुमान जयंती साजरी करण्यावर बंधने असल्यामुळे अनेकांनी घरातच प्रतिमा पूजन केले. तसेच सोशल मिडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. संकट मोचन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाच्या जयंती सोहळ्यावर प्रथमच "कोरोना' चे सावट पसरल्याचे दिसले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT