Hatkanangale
Hatkanangale 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक

संजय खूळ

हातकणंगले मतदारसंघाचे गेली दहा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसेना आणि भाजप युतीचा उमेदवार कोण आणि शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहतात का, यावरच लढतीचे स्वरूप अवलंबून असेल. दुसऱ्या बाजूस जातीचे राजकारण आणि शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार कोण आणि शेट्टी यांना कोणाचा पाठिंबा असणार यावर हातकणंगले मतदारसंघात यावेळचे चित्र अवलंबून असेल. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून शेट्टींनी आपले स्थान निर्माण केले आहे. मागील दोन्ही निवडणुकांत शेट्टींनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. मागील निवडणुकीत ते काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका करून भाजपसोबत गेले. मोदीलाटेचा त्यांना फायदाच झाला. निवडून आल्यानंतर शेट्टींनी वर्षभरात मात्र भाजपच्या विरोधात पवित्रा घेतला. गेल्या निवडणुकीनंतर ‘स्वाभिमानी’तील महत्त्वाचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजपसोबत घरोबा केला. आगामी निवडणुकीत दोन्ही काँग्रेससोबत जाण्याविषयी शेट्टी यांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण याबाबत अद्यापही अनिश्‍चितता असली तरी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. तसेच, शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

यावेळच्या निवडणुकीत जातीचे राजकारण ही काळ्या दगडावरची रेष असणार आहे. याचबरोबर पाकिस्तानवरील कारवाईनंतर बदललेल्या परिस्थितीचा परिणाम या निवडणुकीवर जाणवेल. मतदारसंघातील शिरोळ, 
हातकणंगले आणि शाहूवाडीत शिवसेना, तर इचलकरंजी, शिराळ्यात भाजपचे आमदार आहेत. गेल्यावेळी हे बळ शेट्टी यांच्या पाठीशी होते. हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे गेल्यामुळे शिवसेनेची ताकद शेट्टींना मिळणार नाही. भाजपची ताकद शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील. 

एकूणच बदलती राजकीय स्थिती पाहता हातकणंगले मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरणार हे नक्की.

२०१४ चे मतविभाजन
    राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - ६,४०,४२८ (विजयी)
    कल्लप्पाण्णा आवाडे (काँग्रेस) - ४,६२,६१८
    सुरेश पाटील (अपक्ष) - २५,६४८

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    उसाच्या दराचा तिढा
    इचलकरंजीतील कापड उद्योगातील समस्या
    अनेक रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण
    ग्रामीण भागातील पाणीप्रश्‍न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT