पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य विभाग सुरु करणार सायकल रुग्णवाहिका 

हेमंत पवार

कऱ्हाड - शहरातील वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकदा रुग्णवाहिका संबंधित ठिकाणी पोचत नाही. त्याचबरोबर अनेकदा रस्त्यांच्याही अडचणीमुळे रुग्णवाहिका जागी पोचत नाही. त्यामुळे रुग्णांना सेवा न मिळता ते दगावण्याची शक्यता निर्माण होते. त्यावर पर्याय म्हणुन आता आरोग्य विभागाने सायकल रुग्णवाहिका सुरु करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्यात मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क या परिसरात प्रायोगीक तत्वावर २० सायकल रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. त्याच्या यशस्वीतेनंतर राज्यात हा उपक्रम राबवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोठ्या शहरात रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्याचबरोबर उंचच्या उंच इमारती आणि रस्ते अरुंद यामुळे वाहने संबंधित इमारतीपर्यंत पोचवणेही शक्य होत नाही. अनेक ठिकाणी रुग्णांना त्यामुळे सेवा देताना अडचणी येतात. संबंधित ठिकाणी रुग्णवाहिका पोचत नसल्याने एखाद्या रुग्णाला सेवा द्यायची म्हंटले तरी अडचणीचे होते. त्यामुळे संबंधित रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने सायकल रुग्णवाहीका हा पर्याय पुढे आणला आहे. त्याअंतर्गत अशा मोठ्या शहरात, गर्दीच्या ठिकाणी, जेथे रुग्णवाहिका जाण्यास अडचणी येतात, रस्ते अरुंद आहेत तेथील रुग्णांना प्राथमिक उपचार मिळुन त्यांचा जीव वाचावा या उद्दात हेतुने आता ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगीक तत्वावर ४ लाख २२ हजार रुपये खर्चुन २० ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क या परिसरात ही सेवा सुरु करण्यात येईल. त्यासाठी २० प्रशिक्षीतांची निवड करण्यात येणार असुन संबंधितांकडुन सुमारे दीड किलोमीटर अंतरात रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. १०८ क्रमांकाच्या आरोग्य सेवेशी ही सेवा निगडीत असणार आहे. संबंधित ठिकाणी कॉल गेल्यानंतर सायकल रुग्णवाहिकेवरील प्रशिक्षीत पॅरामेडीक संबंधित रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार प्राथमिक उपचार करेल. किमान एका रुग्णाला पुरेल एवढी औषधे संबंधिताकडे एका बॉक्समध्ये देण्यात येणार आहेत. एखाद्या रुग्णास गंभीर आजार असल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येईल. संबंधित रुग्णवाहिकांच्या यशस्वीतेनंतर संबंधित सेवा ही राज्यात टप्याटप्याने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. 

सायकलवरच सर्वकाही 
आरोग्य विभागाकडुन सायकल रुग्णवाहिका या शासन नियुक्त करणाऱ्या पॅरामेडीक याला प्राथमिक उपचासाठी १४ प्रकारची औषधे व अन्य साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी सायकलवरच एक बॉक्स तयार करुन त्यामध्ये ती औषधे व साहित्य ठेवण्यात येणार आहे. त्याव्दारे संबंधित पॅरामेडीक हा रुग्णांना त्यांच्या घरी जावुन आरोग्य सेवा देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT