पश्चिम महाराष्ट्र

हृदयविकार तीस ते पन्नाशीतच

शिवाजी यादव

कोल्हापूर - वर्षभरात ‘सीपीआर’च्या हृदयरोग विभागात जवळपास १२५० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यात सहाशेंवर व्यक्तींचा वयोगट ३० ते ५० असा आहे. पूर्वी मोजक्‍या व्यक्तींना होणारा हृदयविकार आता तरुण वयात अनेकांना होण्याचे प्रमाण वाढले. अतिरिक्त मांसाहार, तंबाखू सेवन आणि व्यायामाचा अभाव अशी विविध कारणे यामागे आहेत. नियमित काळजी घेतल्यास हृदयविकारापासून दूर राहता येते.

वयाच्या साठीनंतर आढळणारी हृदयविकाराची लक्षणे आता वयाच्या विशीपासून दिसू लागली आहेत. या मागच्या नेमक्‍या कारणांबाबत ‘सीपीआर’च्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात मांसाहार करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अतिरिक्त मांसाहार व तंबाखूच्या सेवनाबरोबर पुरेशी नियमित झोप नाही, ताणतणाव वाढता आहे, या अनियमित सवयी वयाच्या ३० ते ५० वर्षांच्या व्यक्तींत सर्वाधिक दिसतात. त्यातील बहुतेकांना हृदयविकाराची लक्षण आहेत. थोड्याफार फरकाने बालकांतही हृदयविकार लक्षणीय आहे. धाप लागते, शारीरिक वाढ होत नाही, किंवा श्‍वसनाला त्रास होतो, अशा तक्रारी बालकांच्या आहेत. प्रत्येक बालकाच्या अँजिओग्राफीसह विविध तपासण्या ‘सीपीआर’मध्ये केल्या जातात.  गरजेनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. बहुतांश शस्त्रक्रिया मोफत होतात.

हृदयविकाराची लक्षणे दिसताच अनेक जण तपासणी करून घेतात. यातही हृदयविकाराचा गंभीर दोष आढळल्यास त्यांना आम्ही धीर देतो. उपचारांची शाश्‍वती देतो. त्यामुळे बहुतेक जण शस्त्रक्रिया करून बरे झाले आहेत. 
- डॉ. अक्षय बाफना,
हृदयरोग विभागप्रमुख, सीपीआर.  

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी काय करावे?

  •  प्रत्येकाने रोज किमान सहा ते सात तास झोप घ्यावी 
  •  मांसाहार कमी करावा 
  •  जेवणात मीठ कमी असावे  
  •  योगासने व ध्यान करावे
  •  रोज किमान ४० मिनिटे गतीने चालावे 
  •  आठवड्याला किमान १६० मिनिटे जॉगिंग करावे

‘सीपीआर’मधील वर्षातील शस्त्रक्रिया :  

  •  एकूण हृदय शस्त्रक्रिया १२५०
  •  बालकावर, तसेच १०३ वर्षांच्या आजींवरही शस्त्रक्रिया 
  •  २ ते १८ वर्षांच्या २७० रुग्णांवर शस्त्रक्रिया 
  •  ३० ते ५० वर्षांच्या ६०० व्यक्तींवर शस्त्रक्रिया  
  •  गरोदर महिला व बालकांवर बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT