Heartbeat increases for 14 villages in the Dignchi area
Heartbeat increases for 14 villages in the Dignchi area 
पश्चिम महाराष्ट्र

दिघंची परिसरातील 14 गावांची धडधड वाढली... का?

गणेश जाधव

दिघंची : कोरोनाचा लॉकडाऊन जरी 17 मे पर्यंत वाढविला असला तरी शासनाने ओरेंज झोनमधील लोकांना थोडी शिथिलता व परराज्यातील लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी पास दिल्याने अनेक जण परत दिघंची परिसरात असणाऱ्या 14 गावांमध्ये 4500 जण गावपंढरीत परत आल्याने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत. 

दिघंची परिसरातील अनकेजण नौकरी व व्यवसायानिमित्त संपूर्ण देशभर विखुरले गेले आहेत. तर राज्यातील व परराज्यातील प्रत्येक जण सध्या गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहे. येथून पुढे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. दिघंची हे गाव सातारा, सांगली व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांची हद्द आहे. गावाला लागूनच मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्ग असून येथून बऱ्याच जणांचा जाणे व येण्याचा मार्ग आहे. 

सध्या दिघांची व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांना सध्या कोणताही कोरोनाचा प्रादुर्भाव नाही मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून धोका होऊ शकतो या मुळे त्यांची धडधड वाढली आहे. बहुदा काही नागरिक संबंधित यंत्रणेला गावात आल्याची माहिती देतात, मात्र आजही काहीं जण माहिती लपवत आहेत. दरम्यान, बहुतांशी दुकान उघडल्यामुळे सकाळी दहाच्या पुढे व्यापारी पेठेत गर्दी होऊ लागली आहे तर सोशल डिस्टनचा अभाव दिसून येतो. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने नागरिकांना जणू कोरोना देशातून हद्दपार झाल्याचे भास होऊ लागल्या सारखे बिनधास्तपणे फिरत आहेत. मात्र दक्षता कमिटीने सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंतचा व्यवहार सुरू ठेवले आहेत. दुपारी दोन नंतर व्यापरी पेठे व फिरून विकणाऱ्या भाजी मंडईचे शटर डाऊन करण्यात येते. 

महत्त्वाची गावे 
दिघंची, राजेवाडी, लिंगिवरे, पुजारवाडी, पंढरेवाडी, उंबरगाव, पळसखेल, आवळाई, निंबवडे, विठलापूर आदी 14 गावांचा प्रा. आरोग्य केंद्रात समावेश आहे. 

बाहेरून येणाऱ्यांनी संबंधित प्रशासनास माहिती द्यावी

ग्रामस्थांनी घाबरू नये बाहेरून येणाऱ्यांनी संबंधित प्रशासनास माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी तर कोणी माहिती लपविल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. 
- अमोल मोरे, सरपंच. 

पथक करते तपासणी

दिघंची प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत 14 गावे येतात, तर बाहेरून आलेल्या माणसांची माहिती मिळताच आमचे पथक त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाते, तर संशयास्पद वाटल्यास पुढे ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. 
- डॉ. सूरज पवार, वैद्यकीय अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT