Sajay Patil Sakal
पश्चिम महाराष्ट्र

उद्ध्वस्त शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा उद्रेक; खासदार संजय पाटील

अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. विमा कंपन्या त्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. विमा कंपन्या त्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकरी अडचणीत असताना राज्य शासनाने त्यांना मदतीची भूमिका घेतली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि अराजक माजेल. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आज दिला.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. याबाबत खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अवकाळी पावसाने द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून अजून पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. दोन वर्ष कोरोनामुळे मालाची विक्री झालेली नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे आता पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत.

ते म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना वीज वितरण कंपनी कनेक्शन तोडत आहे. ट्रान्सफॉर्मर बंद केले जात आहेत. यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, तसेच जनावरांचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात रोष वाढतोय. हे सगळे ताबडतोब थांबले पाहिजे अन्यथा कायदा-सुव्यवस्था धोक्यात देऊ शकेल.

या संकटाच्या काळात विमा कंपन्याही आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार करत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी भूमिका घ्यावी. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तोमर त्यांना भेटणार आहे. तसेच गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेणार आहे. राज्य शासनानेही शेतकऱ्यांना तात्काळ विमा कंपन्यांकडून भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी काढलेल्या बागांच्या कर्जाचे व्याज माफ करावे तसेच त्या कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे. त्यामुळे त्याला दिलासा मिळेल, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली.

एसटी संपावर समन्वयाने तोडगा काढा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, अनेक दिवस हा संप सुरू आहे त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत शासनाने एक पाऊल मागे घ्यावे. तसेच कर्मचाऱ्यांनी एक पाऊल मागे घेऊन समन्वयाने तोडगा काढून हा संप मिटवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

SCROLL FOR NEXT