पश्चिम महाराष्ट्र

सर्पदंश प्रकरणी हिंगणगावचे डॉक्‍टर वायदंडे  सक्तीच्या रजेवर; चार्ज काढले

सकाळवृत्तसेवा

सांगली : सर्पदंश झालेल्या युवकावर उपचार करण्यात झालेल्या हयगय प्रकरणी हिंगणगाव (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक वायदंडे यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांच्याकडील सर्व कार्यभार काढून घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ही कारवाई केली.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी ही माहिती दिली. 
चार दिवसांपूर्वी हिंगणगाव येथील अक्षय कदम या पंधरा वर्षाच्या युवकाला रात्री नागाने दंश केला. त्याचे पालक त्याला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तेथे डॉ. अशोक वायदंडे हजर नव्हते. त्यांनी मुक्कामी राहणे गरजेचे असताना ते तेथे राहत नाहीत. तेथील आरोग्य सेविकेने हात वर केले. तेथे रुग्णवाहिका होती, मात्र त्याचा चालक गायब होता. त्यामुळे चालकाला आधीच कार्यमुक्त केले आहे. आरोग्य सेविका निलंबित आहे. या साऱ्याची जबाबदारी निश्‍चित करण्याची कारवाई सध्या सुरु आहे. तोपर्यंत डॉ. वायदंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांना सेवेच्या ठिकाणी मुक्कामी राहण्याची सक्ती आहे. असे असताना बहुतांश डॉक्‍टर मूळ गावी किंवा शहराच्या ठिकाणी रहायला आहेत. या हयगयीमुळे अक्षयला आपला जीव गमवावा लागला. त्याबाबत कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी काल सक्त कारवाईची सूचना केली होती. त्यानंतर हालचाली अधिक गतीमान झाल्या. 
दुसरीकडे कडेगाव ग्रामीण आरोग्य केंद्रातही अशाच प्रकारचा हलगर्जीपणा घडला होता.

तेथेही अक्षयला नेण्यात आले होते. तेथेही उपचार करण्यात आले नाहीत. त्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे चौकशी करीत आहेत. तेथील रुग्णवाहिका चालकाला कार्यमुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तेथील डॉक्‍टरांवर चौकशीनंतर कारवाई केली जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT