homeguard
homeguard 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात 24 जुलैला होणार होमगार्ड भरती 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर होमगार्ड अंतर्गत पंधरा तालुका पथकांमधील अनुशेष पूर्ण करण्यासाठी 24 जुलैला सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती 344 पुरुष आणि 154 महिला होमगार्ड पदासाठी होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

सकाळी 11 नंतर येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी करून घेता येणार नाही. नवीन होमगार्ड सदस्य नावनोंदणीबाबतची संपूर्ण माहिती होमगार्ड कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माहिती भरून प्रिंट काढून सोबत आणावे. होमगार्ड ही मानसेवी संघटना आहे. यामधील सदस्य हे मानसेवी असतात. त्यांना या संघटनेत कायमस्वरूपी सामावून घेतले जात नाही. उमेदवाराचे शिक्षण कमीतकमी दहावी उत्तीर्ण असावे. 20 ते 50 वयोमर्यादा तसेच पुरुषांकरिता 162 सेंमी, महिलांसाठी 150 सेंमी उंची, पुरुषांसाठी 1600 मीटर, महिलांसाठी 800 मीटर धावणे आणि गोळाफेक आदी मैदानी चाचणी होणार आहेत. 

उमेदवार हे अन्य कार्यालयात काम करीत असतील तर त्यांना त्यांच्या कार्यालय प्रमुखांचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व अन्य तपशीलासंबंधित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर होणार आहे. प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार नाही, असे श्री. झेंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT