मजुरी करताकरता पती-पत्नी लागले चोऱ्या करायला! 
पश्चिम महाराष्ट्र

मजुरी करता करता पती-पत्नी लागले चोऱ्या करायला!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे लागले.

बेगम पेठ परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खालिद शेख यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणात पोलिसांनी राम सोन्या कांबळे ऊर्फ जाधव (वय 21, रा. पत्राशेड मार्केटशेजारी, पिंपरी, पुणे) व उषा राम कांबळे (वय 24, रा. यशवंतनगर, नुराणी मशिदीजवळ, पुणे) या दोघांना अटक केली आहे. ते दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. राम आणि उषाने यापूर्वी केलेल्या चोरीच्या घटनांची चौकशी पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची ओळख पुण्यात कामावर असताना झाली. गेल्या दोन वर्षांपासून ते एकत्र असून पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.

सात डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे दोघे खालिद शेख यांच्या घरात घुसले. शेख हे काही वेळासाठी घराबाहेर गेले होते. राम आणि उषाने घरातील दागिने, रोकड चोरले होते. काही वेळातच शेख घरी आले. त्यांना दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये चोर असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी बाहेरून कडी लावली. घरमालक आल्याचे लक्षात आल्यानंतर राम हा चोरीचा ऐवज घेऊन छतावर गेला. त्याने गादी फाडून चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवला, तर उषा हिने खोलीत स्वत:ला कोंडून घेतले आणि दागिने अंगावरील कपड्यात लपविले. शेख यांनी पोलिसांना बोलाविले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सात डिसेंबर रोजी या दोघांनी अशोक चौक परिसरातील आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. ते तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर मुक्कामाला होते. बंद घरे शोधून चोरी करण्यासाठी ते सोलापुरात आले होते.

राम आणि उषा दोघेही सराईत गुन्हेगार असून सहज पैसा मिळवून ऐश करण्यासाठी ते या क्षेत्राकडे वळाले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी अशा चोरट्यांकडून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी वॉचमनची नियुक्ती करावी.
- शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT