hydrogen cyanamide used in grapes farm selling at high rates in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी वेठीस : हायड्रोजन सायनामाईडची जादा दराने विक्री

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात द्राक्षाच्या एप्रिल खरड छाटण्या 75 टक्के शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत. बाग एकसारखी फुटावी यासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोजन सायनामाईड पेस्ट काळाबाजारात जादा दराने विक्री केली जात आहे. लिटरला 450 रुपयांनी मिळणारे प्रेस्ट एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात 600 ते 750 रुपयांनी विक्री करण्यात आली. कृषी दुकानांतूनही या काळ्या बाजाराला खतपाणी घालण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाईची अपेक्षा आहे. 

"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर औषध कंपन्या बंद असल्याने त्यासाठी लागणारी हायड्रोजन सायनामाईट पेस्टचा कृषी दुकानांत मोठा तुटवडा होता. जिल्ह्यात 7 एप्रिलनंतर पेस्ट उपलब्ध झाली. मात्र त्याची चढ्या दराने विक्री झाली. काही लोकांनी 20 लिटरमधील पेस्टची खरेदी केवळ 400 रुपये लिटरला करून बाहेर किरकोळ विक्रीचा दर 600 ते 750 रुपये लिटरने पैसे कमावू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या पेस्ट गरजेची असल्यामुळे तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. 

"कोरोना'मुळे गर्दी टाळण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मजूर नेण्यासाठी आणि आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र सुरू आहेत. शेतकऱ्यांना दुकानापर्यंत पोलिस जाऊन देत नाहीत. परंतु द्राक्ष खरड छाटणीसाठी लागणारी खते, पेस्ट यासह विविध औषधे संपत आली आहेत. अनेक कंपन्यांकडे औषधे तयार आहेत. परंतु वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ती औषधे, खते द्राक्ष पट्टयात अद्यापही आलेली नाहीत. 

तक्रारही करता येत नाही

सोनी, कवलापूर परिसरात पेस्टची विक्री एमआरपी पेक्षा जादा किमतीला सुरू आहे. मात्र शेतकरी गरजेपोटी ती मोजतो आहे. ही विक्री दुकानाऐवजी आता काही शेतकऱ्यांच्या घरातून करण्यात येत असल्यामुळे तक्रारही करता येत नाही. 
- एक शेतकरी, सोनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT