पश्चिम महाराष्ट्र

लढण्यासाठी आम्ही पण सीमेवर जावू ..!

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी -  “पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैनिकांची केलेली हत्या अत्यंत चिड आणणारी आहे. आम्हीही भारतीय आहोत. आम्हाला मागे पुढे कोणीही नाही. कुणाचीही काळजी नाही. गरज पडली तर देशभरातील आम्ही एकत्र येवून दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सीमेवर जावू,“ असा निर्धार तृतीयपंथीयांनी व्यक्त केला. 

येथील मलाबादे चाैकात तृतीय पंथीयांनी एकत्र येवून देशप्रेमासाठी प्रथमच आंदोलन करीत पाकिस्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. समाजाच्या विविध प्रवाहातून नेहमीच थोड्याशा बाजूला असलेल्या ‘ते‘ही आज एकत्र आले. हुतात्मा झालेल्या भारतीय जवांनाना त्यांनी श्रध्दांजली वाहिली आणि तीव्र शब्दात दहशतवाद्यांचा धिक्कार केला. 

समाजातील तृतीय पंथीयांना संविधांनाने अधिकार दिले आहेत. या अधिकाराचा वापर करीत शहरात अनेक तृतीय पंथीय संघटीत झाले आहेत. आधार कार्डापासून ते रेशन कार्डापर्यंत सर्व कागदपत्रे आता त्यांनीही तयार करुन आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरात तृतीय पंथीयांची ‘मैत्री‘ ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांच्या नेतृत्वाखाली आज सांयकाळी ‘ते‘ सर्वजण मलाबादे चौकात एकत्र आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदूस्थान जिंदाबाद अशा घोषणांनी त्यांनी चौक दणाणून सोडला. तृतीयपंथीय एकत्र येवून अशा पध्दतीने देशभक्ती दाखवित असतांना या चौकातून जाणारे अनेकजण त्यांच्या या आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी झाले. सर्व हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अ‍ॅड. मुजावर यांनी काश्मीर मधील घटनेचा तीव्र निषेध करुन सरकारने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. 

“ देशाच्या वीर जवानांवर पाकिस्तानने अत्यंत भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यापुढे आम्ही ही देशप्रेमापोटी रस्तावर उतरु.“
- मस्तानी नगरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT