Harshvardhan Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Harshvardhan Patil: 'इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर' म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना माज आलाय, विरोधकांची टीका

Harshvardhan Patil said Ichalkaranji Pakistan Occupied Kashmir: राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

कार्तिक पुजारी

सांगली (Ichalkaranji Rally)- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?

हर्षवर्धन पाटील सांगली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल माने यांचे अभिनंदन केले. धैर्यशिल माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हातकणंकले पूर्वी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, 'इचलकरंजीचा लोकसभा मतदारसंघ, हा पाकव्याप्त काश्मीर म्हणला पाहिजे. आजूबाजूला सगळी परिस्थिती वेगळी होती. आजूबाजूला सर्व प्रतिकूल शक्ती होत्या. अदृश्य शक्ती काम करत होती. अशा परिस्थितीत धैर्यशिल माने यांनी विजय प्राप्त केला. त्यांनी वादळात दिवा लावला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो.'

हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना माज आलाय असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, सत्तेचा माज आलाय यांना. महाराष्ट्रातील भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणत आहेत. अशी वक्तव्य करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न आहे. पण, हा माज जास्त काळ राहणार नाही. राज्याची जनता त्यांना जागा दाखवेल आणि त्यांचा माज उतरवेल.

दरम्याण, हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे धैर्यशिल माने यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा पराभव केला आहे. लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली, पण माने यांनी सत्यजीत पाटील यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT