Immediately repeal anti-farmer laws ....
Immediately repeal anti-farmer laws .... 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरीविरोधी कायदे त्वरित मागे घ्या....

शांताराम पाटील

इस्लामपूर : शेतकरीविरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत म्हणून कुटुंबापासून लांब ऊन, वारा याची तमा न बाळगता शेतकरी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. त्यांच्याशी बोलायला केंद्र सरकारला वेळ नाही. केंद्र सरकारने हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रतिक पाटील यांनी केली. 

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून व केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, या मागणीसाठी वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने युवा नेते प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आष्टा ते इस्लामपूर असा ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्यात आला. आष्टा येथून सुरू झालेला हा ट्रॅक्‍टर मोर्चा इस्लामपुरात तहसीलदारांना निवेदन देऊन सभेत रूपांतरित झाला. यावेळी प्रतिक पाटील बोलत होते. 

प्रतिक पाटील म्हणाले, "70 वर्षांत कॉंग्रेसने काय केले, असे भाजपचे समर्थक विचारतात. 70 वर्षांत शेतकऱ्यांवर कॉंग्रेसने अन्याय केला नाही. केंद्र सरकार करार शेतीला प्राधान्य देऊ पाहतंय; मात्र अनेक शेतकरी अडाणी असल्याने अटी व शर्थी न वाचताच करार करतील. त्यामुळे कोणतीही कारणे काढून शेतकऱ्यांची लुबाडणूक होईल. कमी दरात शेतमाल खरेदी करून कंपन्या कोणत्याही दराला विकतील. अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांना येणार आहेत.' विजय बापू पाटील म्हणाले, "दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला पंतप्रधानांना वेळ नाही; मात्र ते मन की बात करतात. देशाच्या सर्व पोशिंद्याला आज पाठिंबा देऊन केंद्र सरकारला कायदे रद्द करायला लावले पाहिजेत.' संग्रामसिंह पाटील म्हणाले, "संडल बंडल लोक केंद्र सरकारमध्ये असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत. आम्ही शेतकऱ्यांसाठी यापुढेही रस्त्यावर उतरू.' 

यावेळी शहाजीबापू पाटील, ऍड. चिमण डांगे, पै. भगवान पाटील, सुस्मिता जाधव, छायाताई पाटील, अमोल गुरव, बाळासाहेब पाटील, रणजित तेवरे, ब्रह्मानंद पाटील, तानाजी मोरे, रोजा किणीकर्या यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चाला वाळवा तालुक्‍यातून 300 ट्रॅक्‍टर घेऊन शेतकरी उपस्थित होते.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT