पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर फाउंड्रीसाठी वीजदर कपात करण्याची उद्योगमंत्र्यांची घोषणा

सकाळवृत्तसेवा

पणजी - कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फाउंड्री उद्योगासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात महाराष्ट्र राज्य सरकार काही दिवसांत कपात करणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे ही घोषणा केली. 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे येथे गुंतवणूक प्रोत्साहन उद्योजक परिषद झाली. त्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि गोव्यातील उद्योजक व्यासपीठावर होते.
कोल्हापूरमध्ये फाउंड्री उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.

फाउंड्री  उद्योजकांची महाराष्ट्राकडे अनेक दिवसांपासून वीजदरात कपात करावी, अशी मागणी होती. ती मागणी राज्य सरकारने आता मंजूर केली असून, काही दिवसांत फाउंड्री उद्योगाच्या विजेच्या दरात कपात केली जाणार आहे. तशी घोषणा उद्योगमंत्र्यांनी गोव्यातील कार्यक्रमात कोल्हापुरातून आलेल्या उद्योजकांसमोर केली. 

या घोषणेमुळे कोल्हापुरातील फाउंड्री उद्योजकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. स्टील उत्पादनात कोल्हापूर औद्योगिक वसाहत अग्रेसर आहे. येथील फाउंड्री उद्योग १९६५ पासून कार्यरत असून, वीज दरवाढीचा फटका सतत या उद्योग-व्यवसायाला बसला आहे. सध्याच्या वीज दरामुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे फाउंड्री उद्योगाला लागणाऱ्या विजेच्या दरात कपात करावी, अशी मागणी केली होती. ती मागणी राज्य शासनाने मान्य केली असून, काही दिवसांत या विषयाची कार्यवाही पूर्णत्वास येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

या परिषदेला कोल्हापुरातील ‘स्मॅक’चे माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन, इंजिनिअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब कोंडेकर व गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहन कुशिरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT