Information and technology exchange in Murshiya and Solapur
Information and technology exchange in Murshiya and Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

मुर्शिया व सोलापूरमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : मुर्शिया (स्पेन) आणि सोलापूर स्मार्ट सिटी यांच्यात माहिती व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यास दोन शहरांच्या महापौरांनी संमती दर्शविली. शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत सोलापूर महापालिका आणि मुर्शिया या शहरा दरम्यान 24 मे रोजी सांमजस्य करार झाला होता. त्या अनुषंगाने सोलापूरचे शिष्टमंडळ शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत मुलभूत सुविधा सुकर करण्याबाबत वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी यामध्ये प्रदुषण, पाणी पुरवठा, उद्योगवाढीसाठी तंत्रज्ञान यातून आदर्श शहरांची निर्मितीबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहे.

मुर्शियातील सिटी हॉल येथे महापौर डॉ. जोस बॉलेस्टा यांनी स्वागत केले. महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, नगरअभियंता संदीप कारंजे उपस्थित होते. महापालिकेचे महापौर व आयुक्त यांच्या वतीने मुर्शिया शहराचे डॉ. बॉलेस्टा यांचेही भारतीय संस्कृती पध्दतीने शाल पांघरून सत्कार करण्यात आला.

स्वागत सभारंभानंतर झालेल्या परिषदेत मुर्शिया व सोलापूर शहराच्या माहितीचे सादरीकरण झाले. मुर्शिया व सोलापूर शहरांचे धोरणाबाबत चर्चा झाली. दोन्ही शहराच्या महापौरांनी माहिती व तंत्रज्ञान यांची आदान-प्रदान करण्याबाबत संमती दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT