An inscription of 650 years ago was found in Vajravad of Jat taluka
An inscription of 650 years ago was found in Vajravad of Jat taluka 
पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्‍याच्या वज्रवाडमध्ये मिळाला 650 वर्षांपूर्वीचा शिलालेख 

प्रमोद जेरे

मिरज : जत तालुक्‍याच्या इतिहासाबाबत नवी माहिती देणारा 650 वर्षांपूर्वीचा हळेकन्नड लिपीतील शिलालेख वज्रवाड (ता. जत) येथे मिरज इतिहास संशोधन मंडळास मिळाला आहे. मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी हे संशोधन केले. हा शिलालेख सन 1371 मध्ये सिद्धनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारसाठी आणि पूजा-नैवेद्यासाठी काही जमिन दान दिल्याबाबत आहे. 

गावातील ओढ्याच्या काठावर बसवेश्‍वर मंदिरात हा शिलालेख आहे. हे मंदिर उत्तर चालुक्‍याच्या काळात हेमाडपंथी पद्धतीने बांधले आहे. त्याला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग आहेत. त्यापैकी जुना सभामंडप नष्ट झाला आहे. अंतराळ गाभारा शिल्लक आहे. अंतराळ भागात दगडी भींतीवर हा शिलालेख हळेकन्नड भाषेत तीन टफ्फ्यात बारा ओळींचा आहे. त्याला अलिकडे ऑइलपेंटने रंगवल्याने अस्पष्ट अक्षरे ऑइल पेंट काढल्यानंतर स्पष्ट दिसू लागली. 

कर्नाटकातील हंपीचे कलवीर मन्वाचार्य यांच्याकडून त्याचे वाचन करून घेतले गेले. यात मूळ मंदिर हे शिवालय आहे. त्याचे नाव सिद्धनाथ असे होते. सध्या ते बसवेश्‍वर मंदिर या नावाने ओळखले जाते. सन 1371 मध्ये याचा जीर्णोद्धार करताना त्याची नोंद करण्यासाठी हा लेख कोरण्यात आला. यावेळी देवगिरीच्या यादवांची सत्ता जाऊन मुस्लिम राजसत्ता आली. यावेळी मंदिराचा जीर्णोद्धार वज्रवाड येथील व्यापारी गोपाळशेट्टी यांचा मुलगा राजशेट्टी याने केला. तत्कालीन प्रसिद्ध वीरवणज या व्यापारी संघटनेचाही उल्लेख यात आहे. 

शिलालेख नष्ट करू नये... 
या शिलालेखात शके 1293 मध्ये नाम संवत्सराच्या फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रोहिणी नक्षत्रात हा जीर्णोद्धार गोपाळशेट्टी याच्या मुलाने केला. त्याची इंग्रजी तारीख 3 फेब्रुवारी सन 1371 आहे. हे शिवालय असून त्याच्या अंगभोग आणि रंगभोगासाठी काही जमीन ब्राम्हणांना दान देण्यात आली आहे. हा शिलालेख नष्ट करू नये, असे वाक्‍यही यात आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT