पश्चिम महाराष्ट्र

Mother's Day :आमची आई कधी बरी होईल?

सुधाकर काशिद

कोल्हापूर - आज मातृदिन आहे, की नाही हे त्यांना माहितही नाही; पण आपलं आयुष्य म्हणजे आई आहे, एवढ त्यांना नक्की माहिती आहे. त्यामुळे आपली आई कधी बरी होईल? एवढीच एक भाबडी अशा या तिघांना आहे. त्यांच्या आईला एका मोटारसायकलने धडक दिली आहे. ती अर्धवट बेशुद्धावस्थेत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्‍टरांच्या मते ती मरणाच्या दारातून परत आली आहे; पण हे तिघे मात्र आपली आई डोळे उघडून आपल्याकडे कधी बघेल? ये सायली, ये स्वप्नाली, ये कुणाल म्हणून कधी हाक मारेल, या आशेने हे दवाखान्याच्या दारात बसून आहेत. 

शेतमजुरी करून घर चालवणारी सुरेखा आणि तिच्या तीन लहान मुलांची मन विषण्ण करून टाकणारी ही कथा आहे. सुरेखा वडर या शिरोळला राहतात. त्यांना सायली (वय १७), स्वप्नाली (वय १२) व कुणाल (वय १०) ही तीन लहान मुले. ती दिवसभर भांगलणीला जाते व आपल्या तीन मुलांना सांभाळते.

काही दिवसांपूर्वी ती काम आटोपून घरी येताना एका मोटारसायकलस्वाराने तिला धडक दिली व तो पळून गेला. ही रस्त्यावरच पडून राहिली. डोक्‍याला मार लागल्याने कोमात गेली. सरकारी दवाखान्यात उपचाराला नेले; पण उपचाराला फारसा प्रतिसाद नाही. आणि कोल्हापुरात थांबून तिच्या औषधपाण्याचे बघायलाही कोणी नाही. तीन मुले सैरभैर झाली. मदतीला आजी-आजोबा आले; पण पैशाची जुळणी तुटपुंजीच. मग सरकारी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन शिरोळलाच ‘शतायू’ या दवाखान्यात दाखल केले.

काही लोकांनी इकडून तिकडून मदत केली. तीन लहान मुले त्यांच्या आईची ही अवस्था पाहून शतायूच्या डॉक्‍टरांनी आपले कसब लावले. यांच्याकडे औषधाला पैसे नाहीत हे ओळखून दवाखान्यातील औषधावरच उपचार सुरू केले. 

आईची अवस्था पाहून सायली, स्वप्नाली व कुणाल ही मुले तर हबकूनच गेली. सारखी काही निमित्त काढून आयसीयूत जायची. आईकडे बघायची आणि परत जायची. डोळे झाकलेली आई, तिच्या तोंडावर ऑक्‍सिजनचा मास्क, डोक्‍याला बीप बीप करणारं मशीन पाहून भेदरायची. आई कधी बर होणार म्हणून आजोबाला सारख विचारायची. या पोरांची समजूत काढता काढता आजोबाची कसरत व्हायची. 

आता डॉक्‍टर विशाल चौगुले यांच्या मते ती धोक्‍याच्या बाहेर आहे. ते त्यांच्या सोबत डॉक्‍टर राहुल खोत, डॉ. सुशांत पाटील, डॉ. कुलभूषण चौगुले, डॉ. रवींद्र भोसले उपचारांची शर्थ करत आहेत. या परिस्थितीतून ती बाहेर पडेल हा पुढचा भाग आहे. पण दवाखान्याच्या दारात बसलेल्या या तिघा मुलांच्या नजरेत आपली आई कधी बरी होईल ही जी प्रतीक्षा आहे. ती खूप गलबलून टाकणारी आहे.

या मुलांच्या आईवरील उपचारासाठी जेवढे करता येईल तेवढे आमच्या शतायूच्या टिमने केले आहे. या मुलांना त्यांची आई पुन्हा हाक मारेल तो क्षण आम्हा डॉक्‍टरांच्या प्रयत्नाचे यश असणार आहे. आणि तो दिवस या मुलांच्या दृष्टीने मातृदिन असणार आहे. 
- डॉ. विशाल चौगुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT