पश्चिम महाराष्ट्र

सातारा - पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

निवेदनात नमूद केले आहे, की सहापदरीकरणाच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने त्याचा त्रास सातारकरांना जीव जाईपर्यंत होत आहे. शेकडो लोकांचे प्राण या दर्जाहीन व गुणवत्ताहीन कामामुळे गेले आहेत. त्यांची कुटुंबे पोरकी झाली आहेत. 12 सप्टेंबरला झालेल्या भीषण अपघातातही सहा लोकांनी प्राण गमावला, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हा अपघात घडला. हा सदोष मनुष्यावधाचा गुन्हाच आहे.

सातारा- पंढरपूर रस्त्याचे गेली दोन वर्षे सुरू असलेले काम अजून अपूर्ण आहे. सातारा- कोरेगाव, सातारा- पुसेगाव या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. ही कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत. सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच शहराला जोडणारे राज्य, राष्ट्रीय महामार्ग यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्डेयुक्‍त रस्त्यापासून खड्डेमुक्‍त रस्ते होईपर्यंत पाठपुरावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदन देते वेळी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव श्रीराज दीक्षित, उपाध्यक्ष अनुप शिंदे, खजिनदार साहिल शेख, माजी राज्याध्यक्ष सुधीर घार्गे, राष्ट्रीय विश्‍वस्त विजय देवी, सचिन देशमुख, सुहास शिंदे, ओंकार शिंदे, संदीप जाधव, संजय खटावकर, हनुमंत वळसे, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

दंडेलशाहीने टोलची खंडणी 
महामार्ग म्हणायला लाज वाटावी, अशा रस्त्यावर दंडेलशाहीने खंडणी वसूल करण्याचे काम सुरू आहे. त्याला टोल असे नाव दिले आहे. आता सातारकर नागरिकांच्या सहनशक्‍तीचा अंत झाला आहे. कायम शांतताप्रिय मार्गाने चालणाऱ्या सातारकर नागरिकांचे उग्र आंदोलनात रूपांतर होण्याच्या आत तुम्ही लक्ष घालावे. ही रस्त्याची कामे दिरंगाईने का सुरू आहेत, ते पाहून ती त्वरित पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT