Islampur Municipal Corporation
Islampur Municipal Corporation  sakal
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपुरात मुख्याधिकारी दालनातच राष्ट्रवादीत तू-तू, मै-मै! पुणेकर-कोरे धावले एकमेकांच्या अंगावर!

धर्मवीर पाटील,

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेतील गटनेते संजय कोरे आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात आज मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या दालनातच "तू तू- मै मै" प्रकार झाला.

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरपालिकेतील गटनेते संजय कोरे (Sanjay Kore) आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर (Pirali Punekar) यांच्यात आज मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या दालनातच "तू तू- मै मै" प्रकार झाला. एकमेकांना शिव्या घालत अंगावर धावून (Disturbance) जाण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने पालिका (Municipal) वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एकमेकांना शिवीगाळ करताना चढलेला आवाज ऐकून पालिका आवारातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात गर्दी करत या दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे योगायोगाने राष्ट्रवादीचे आणखी काही नेते यावेळी उपस्थित होते.

संजय कोरे हे केली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत होते आणि पिरअली पुणेकर हे स्वतः माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी गेली पाच वर्षे नगरसेविका होत्या. संजय कोरे यांचा प्रभाग सात तर पीरअली पुणेकर यांचा प्रभाग आठ क्रमांकाचा आहे. दोघांचे प्रभाग एकमेकांना जोडून आहेत. या प्रभागातील ईदगाहच्या विकासकामांशी संबंधित विषय घेऊन पुणेकर नगरपालिकेत आले होते. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मुनिर पटवेकर हेदेखील आले होते.

दरम्यान काही कामानिमित्त संजय कोरे हेदेखील पालिकेत दाखल झाले. ईदगाहच्या कामावरून दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक चकमक उडाली. यातून दोघांनी एकमेकांना शिव्या देणे व एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, खंडेराव जाधव आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील हेदेखील पालिकेत आधीच उपलब्ध होते. मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे काहीतरी काम असल्याने योगायोगाने हे नगरसेवक आज पालकेत पालिकेत आल्याचे समजले. दुर्दैवाने त्यांच्या नजरेसमोरच ही वादावादीची घटना घडली. या सर्वांनी दोघांच्यात मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "हे पदाधिकारी आपापल्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, काही पूर्वनियोजित बैठक वगैरे नव्हती किंवा मी कोणत्याही कामासाठी त्यांना बोलावलेले नव्हते."

निवडणुकीच्या तोंडावर आपापसात भांडण्याचा हा प्रकार शहरात चर्चेचा विषय बनला. दोघांचे प्रभाग एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे दोन्ही प्रभागातील कामांचा एकमेकांशी संदर्भ असल्याची चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT