nishikant bhosale patil.jpg
nishikant bhosale patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूरचे नगराध्यक्ष काय म्हणतात..वाचा 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर-पाच-सहा दिवसापासुन शहर भयभीत झाले आहे, "कोरोना' च्या जबड्यात शहरातील मणेर कुटुंब अडकले. दक्षता म्हणून सर्वस्तरावर उपाययोजना सुरु आहेत. काही नागरीक गांभीर्य नसल्यासारखे खुलेआम शहरात भटकत आहेत. काही लोक शहराची "वुहान' म्हणुन ओळख निर्माण करत आहेत. तर काही नागरीक मणेर कुटुंबाला दोष देऊन शब्दांची पातळी ओलंडत आहेत. शहरवासियांनो जरा थांबा, शहराची बदनामी थांबवा, संकटाला सामोरे जाऊया, माणुस होऊया, सर्व नीट होईल अशा शब्दात लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. 


ते म्हणाले, ""आपल्या शहराला संस्कृतीचा वारसा आहे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने रहातात. अनेक सण एकत्रीत साजरे करतात. अनेक संकटाला शहर यापुर्वी सामोरे गेले आहे. शहर तालुक्‍याच्या विकासाचे केंद्र आहे. आर्थिक उलाढालीचे, शिक्षणाचे, साहित्यिकांचे, सुज्ञ, वैचारीक नागरीकांचे तसेच प्रेम व आदर असणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र काहीजण हे शहर संपुर्ण राज्यभर व देशभर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन बदनाम होते की काय? भिती वाटु लागली आहे. हे खेदजनक आहे.'' 


ते पुढे म्हणाले, ""शहरातील मणेर कुटुंब 13 मार्चला हजयात्रेवरून आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच तत्काळ प्राथमिक तपासणी करून होम क्वारंटाईनखाली ठेवले. 19 रोजी मणेर कुटुंबातील चार लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ प्रशासन व नगरपालिकास्तरावर दखल घेऊन उपाययोजना केली. त्याचे तुम्ही साक्षीदार आहातच. मणेर कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व इतरांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आले. आणखी काहीचे रिपोर्ट "पॉझीटीव्ह' आल्याने शहर भितीच्या छायेखाली गेले. त्यातच सोशल मिडीयावर "वुहान' म्हणून शहराची ओळख काहीजण निर्माण करत आहेत. तसे मणेर कुटुंबाला लक्ष्य केले जातेय. हे सर्व खेदजनक वाटत आहे.'' 


ते म्हणाले, ""मणेर कुटुंबातील 37 पैकी 23 लोक कोरोना ग्रस्त आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 338 लोक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. शहराचा कुटुंबप्रमुख म्हणून माझे सर्वांना "घराबाहेर पडु नका' असे आवाहन आहे. आम्ही सर्वजण शहराच्या व आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. जीवनावश्‍यक वस्तू घरापर्यंत पोहोच होण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. काहीजण नियोजनावर चुकांचा भडीमार करत आहेत. परिस्थितीनुसार नियोजन केलेले आहे. सर्वांना एकच विनंती आहे की, शहराची "वुहान' बरोबर तुलना करू नका. मणेर कुटुंब आपल्यातीलच एक आहे. अनावश्‍यक चर्चा टाळून माणूसकीतील ओलावा निर्माण करा.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

SCROLL FOR NEXT