इस्लामपूर crime sakal
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच दिली खुनाची सुपारी; पतीसह दोन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव, ता. वाळवा) यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचा उलगडा कासेगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी केला आहे.

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव, ता. वाळवा) यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचा उलगडा कासेगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी केला आहे. यातील खुनाची सुपारी देणारा पती सुरेश नारायण ताटे (वय ४५, रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) आणि दोघे मारेकरी विशाल जयवंत भोसले (वय २५, रा. कामेरी) व शिवाजी भीमराव भुसाळे (वय ३७, रा. मूळ गाव उजळम, ता. बसवकल्याण, जिल्हा बिदर कर्नाटक, सध्या रा. महादेवनगर, इस्लामपूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. २४ तासात खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडे सात-आठ वाजण्याच्या सुमारास कासेगाव-वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव, ता. वाळवा) यांचा दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत महादेव शिद (वय ४४, कासेगाव) यांनी फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याबाबत पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, की या खुनात बंदुकीचा वापर केल्याने हे प्रकरण गंभीर होते. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यात जातीने लक्ष घालून तपासाच्या सूचना, मार्गदर्शन केले होते. खुनाचे नेमके धागेदोरे नाल्याने तपास किचकट होता. भावकीतील जमिनीचा वाद, अनैतिक संबंध किंवा आर्थिक देवाणघेवाण यातून हा प्रकार घडल्याचा संशय होता. त्यानुसार इस्लामपूर, शिराळा-कासेगाव पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक स्वतंत्रपणे यावर काम करत होते. पथकात ३८ जणांचा समावेश होता.

मुख्य आरोपी सुरेश ताटे हा इस्लामपूर येथील एका गॅस एजन्सीत कामाला होता. त्याच्या पत्नीचे आणि मृत पांडुरंग शिद याचे अनैतिक संबंध आहेत असा त्याला संशय होता. ताटेची बहीण आणि मृत शिदची बहीण एकाच घरात दिल्या आहेत. ताटेची पत्नी आणि शिद हेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यात लहानपणापासून परिचय होता. विविध कारणांनी, कार्यक्रमांच्या निमित्ताने ते भेटत, बोलत असत. त्यातूनच अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याने शिदचा काटा काढायचा या हेतूने एकाकडून चार महिन्यांपूर्वी ५० हजार रुपये देऊन पिस्तुल आणि तीन गोळ्या मिळवल्या होत्या.

ताटेकडे कामाला असलेल्या भोसले आणि भुसाळे या दोघांना त्याने पांडुरंग शिदला मारण्याची सुपारी दिली होती. ते दोघेही गरीब आणि गरजू होते, त्याचा गैरफायदा घेऊन ताटे याने त्यांच्यावर दबाव आणला होता आणि खून झाल्यानंतर ६ लाख रुपये देण्याचे कबुल केले होते. या दोघांनी काही दिवस रेकी करून शिद हा रोज सकाळी जनावरांना चारा आणि धारा काढायला जातो हे हेरले होते. त्यानुसारच त्यांनी १६ ऑगस्टला सकाळी हा खून केला. घटनास्थळी एक गोळी पोलिसांना आढळली आहे. या दोघांनी आपले मोबाईल घरीच ठेवले होते त्यामुळे फोनवरून शोध लागणे अशक्य होते. मात्र अथक शोधमोहीम राबवून पोलिसांनी २४ तासात खुनाचा छडा लावला. या तपासात सतीश शिंदे, हरिश्चंद्र गावडे, नितीन सावंत, विक्रम पाटील, पंकज पवार, रुपाली बोबडे, जयनाथ चव्हाण, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, आनंदा चव्हाण, अनिल पाटील, दीपक हांडे यांनी सहभाग घेतला.

पाच दिवसांची कोठडी

ताटे अनेक दिवस शस्त्राच्या शोधात होता. याबाबत इस्लामपूर आणि आष्टा येथील दोघांकडून पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताटे याला बोलते केले. त्यातून ताटे याने गुन्ह्याची कबुली दिली. ताटेसह दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी तिघांनाही २२ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शस्त्र नेमके कुठून आले, कुणी पुरवले, कोणत्या ठिकाणाहून आणले गेले? याचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

युट्युबवरून बंदुकीचे शिक्षण

गोळ्या झाडणारे दोघे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना बंदूक कसे वापरायचे याबद्दल कसलेही ज्ञान नव्हते. पण सुरेश ताटे याने युट्युबवरील व्हिडिओचा आधार घेऊन ते बंदूक कसे वापरायचे हे शिकवले. गोळ्या चालवताना चुकून एक गोळी घटनास्थळी पडली होती. ती त्या दोघांपैकी एकाला लागली असती आणि त्यातील एकाला इजा होण्याची शक्यता होती, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT