islampur muncipal carporation
islampur muncipal carporation 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत राष्ट्रवादीने कसली कंबर: विकास आघाडी आक्रमक

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (सांगली) : शहरात निवडणूक जवळ येतील तशा राजकीय हालचाली गतिमान होत असताना शहरातील सत्ताधारी विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हालचालीदेखील गतिमान झाल्या आहेत. सत्ताधारी विकास आघाडी आक्रमक बनली आहे. तर त्याला तितक्‍याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असल्याचे दिसत आहे.

राज्यातील सत्तेत सहभागी असणारा पक्ष असूनही शहरातील सत्तेत मात्र विरोधकाच्या भूमिकेत रहावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर आहे. सत्तेत असल्याचा फायदा घेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील आपल्या आघाडीतील सहकाऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादीला शह देण्याच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, त्याला तितक्‍याच आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी तयारी करत असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रयत्न करून शहरातील काही कामांसाठी सुमारे पंधरा कोटी रुपये मंजूर करून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याला सहजासहजी मंजुरी मिळेल तर राजकारण कसले? मुळात या विषयावर सभा व्हावी या मागणीला दोन महिने जावे लागले. त्यासाठी राष्ट्रवादीला जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागले.

नगराध्यक्ष चुकीचा कारभार करत असल्याची तक्रार झाली. त्याला तितक्‍याच ताकदीने नगराध्यक्षांनी उत्तर दिले. मार्च महिन्यात नियमाने सभा घ्यावी लागली, परंतु त्यातही अडथळे आलेच. राष्ट्रवादीच्या चुका अलगद झेलत ही सभा महिना अखेरपर्यंत लांबवलीच. यातील काही कामे चुकीची, मंजुरी न मिळणारी असल्याचा नगराध्यक्षांचा दावा आहे. काही कामांच्या जागाच ताब्यात नाहीत तर ती कामे होणार कशी? असा त्यांचा सवाल आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जुन्या काही चुकीच्या ठरावांना, निर्णयांना आव्हान देत त्यावर कारवाईची भूमिका आघाडीने घेतली.

हेही वाचा- धक्कादायक! मुलासह आई- वडीलांनी घेतली नदीत उडी

संचारबंदी असताना रात्रीच्या अंधारात मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे प्रारंभ घेण्याची राष्ट्रवादीची गडबड चर्चेत आली. त्यावर राष्ट्रवादी कसा बदनाम पक्ष झालाय हे वैभव पवार यांनी चव्हाट्यावर आणले तर त्याला त्याच भाषेत राष्ट्रवादीने उत्तर दिले. राष्ट्रवादीकडून विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव किल्ला लढवत आहेत.

अपक्ष आघाडीचे उपनगराध्यक्ष दादासो पाटील सोबत आहेतच. चार दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर नामफलक लावून तथाकथित ‘लोकार्पण’ घेण्याचा आघाडीचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे राष्ट्रवादीने जनतेसमोर आणले. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळेल अशी स्थिती असताना त्याला आघाडीने तूर्तास थंडा प्रतिसाद दिला असला तरी हा विषय वादग्रस्त बनणार हे नक्की आहे.

चर्चा निवडणुकीची!

सत्ताधारी आणि विरोधक या हालचाली गेल्या चार वर्षांत सातत्याने सुरूच राहिल्या; परंतु आता अलीकडच्या काळात त्या आणखी गतिमान झाल्याच्या दिसत आहेत. दोन्हीकडच्या प्रत्येक कृतीला ‘राजकीय रंग’ आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय चर्चांना ऊत येत असल्याचे दिसत आहे.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT