पश्चिम महाराष्ट्र

‘ॲप्लिकेशन’ घेऊनही विवाह ठरला नाही

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - सभासद व्हा, ॲप्लिकेशन घ्या, प्रोफाईल पाहा आणि विवाह ठरवा, असे आमिष दाखवले जात आहे. प्रत्यक्षात ॲप्लिकेशनवर काहीच प्रतिसाद मिळत नाही. ॲप्लिकेशनसाठी बारा-पंधरा हजार रुपये घेऊन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. 

विवाह ठरविण्यासाठी काही संस्थांकडून आमिषे दाखवली जात आहेत. त्यातून तरुणांची फसवणूक होऊन त्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे, अशी फसवणुकीची तक्रार शाहूवाडी तालुक्‍यातील एका तरुणाने ग्राहक मंचकडे केली आहे.

‘शुभविवाह’ करण्यासाठी काही तरुणांना उचित वधू मिळत नसल्याची उदाहरणे आहेत. यातून पर्याय म्हणून एका तरुणाला त्याच्या मित्राने गळ घातली. विवाह जुळवणाऱ्या संबंधित एका संस्थेचा सदस्य होण्यासाठी भाग पाडले. त्याच्याकडून दोन हजार रुपये घेतले. त्याची पावतीही दिली. काही दिवसांपर्यंत त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्याने संबंधित संस्थेकडे तक्रार केली. या वेळी त्यांनी तुम्हाला मॅरेज प्लॅन ॲप्लिकेशन घ्यावे लागेल, असे सांगितले. पंधरा हजार रुपयांचे ॲप्लिकेशन तीन हजार रुपये डिस्काउंट देऊन बारा हजारांना ठरविले. संबंधित तरुणाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने मित्राच्या आग्रहानुसार आणखी दहा हजार रुपये भरले. त्याचीही पावती त्यांना मिळाली.

या वेळी त्याला ‘पासवर्ड’ आणि ‘युजर’ दिला. काही दिवसांत त्याचा प्रोफाईल कोणीही पाहत नाही आणि इतरांचे प्रोफाईलही दिसत नसल्याची तक्रार त्याने संस्थेत केली. त्यानंतर त्याला ॲप्लिकेशन सुरू करून दिले. चार महिन्यांनंतरही एकाही व्यक्तीने त्याचे प्रोफाईल पाहिले नाही. याची तक्रार करण्यासाठी संबंधित तरुण वारंवार संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधत होता; मात्र तेथून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. काही वेळा साहेब आजारी आहेत, परीक्षा आहे, रजेवर आहेत, अशी उत्तरे दिली जात होती. अखेर संबंधित तरुणाने संस्थेच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली, तेव्हा तेथे असलेल्या महिला प्रतिनिधीकडून, ‘विवाह मुहूर्त नाहीत, तुमचे शिक्षण कमी आहे, विवाह जुळायला वेळ लागेल, आमचे एक्‍झिक्‍युटिव्ह बिझी आहेत, तुम्हाला आवडणाऱ्या मुली जास्त शिकलेल्या आहेत,’ अशी उत्तरे मिळाली.

डिसेंबर २०१८ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया १९ जूनपर्यंत अशीच सुरू आहे. प्रत्यक्षात ग्राहकाचा काहीच फायदा नसल्याचे दिसून आले.

टकाटक ऑफिस
उच्चभ्रू वसाहतीत संस्थेचे ऑफिस आहे. ते एकदम टकाटक आहे. तेथे उच्चभ्रूंची वर्दळ आहे. त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणाचेही धाडस होणार नसल्याचे संबंधित तरुणाकडून सांगण्यात आले. विवाह इच्छुक तरुण-तरुणींनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी संस्था आणि संस्थेने यापूर्वी जमवलेले विवाह पाहूनच विश्‍वास ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT