पश्चिम महाराष्ट्र

जतच्या त्या कुटुंबाला 40 वर्षांनी मिळाला न्याय 

सकाळवृत्तसेवा

सांगली - गेल्या चाळीस वर्षांपासून वाळीत टाकलेल्या जतमधील मारुती कोळी या मरीआई समाजातील कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भटक्‍या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला हे यश मिळाले आहे. जत पोलिसांनी जातपंचाना बोलावून घेत सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा बडगा दाखवला. त्यावेळी पंचांनी एक पाऊल मागे घेत, कोळी कुटुंबीयांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कोळींच्या लग्न समारंभावेळी पंचाचे ऐकले नसल्याने त्यांना लाखाचा दंड केला. त्यानंतर दोन लाखांचा दंड केला. कोळी कुटुंबीय एवढी मोठी रक्कम भरण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत केले. त्यांच्या मुलींच्या लग्न कार्यावेळीही पंचाकडून अडवणूक केली जात होती.

दरम्यान, कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंनिस आणि भटक्‍या विमुक्त हक्क परिषदेकडे धाव घेतली. त्यांच्या माध्यमातून जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्याकडे लेखी तक्रारही देण्यात आली. 

दरम्यान, अधीक्षक शर्मा यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जत पोलिसांना दिले. त्यानुसार निरीक्षक राजू तासिलदार यांनी जातपंचाना ठाण्यात बोलावून घेतले. सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती देत चांगलेच सुनावले. त्यानंतर पंचानी कोळी कुटुंबीयांना समाजात घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडू, असे आश्‍वासनही दिले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान दिला जाईल, असे लेखी दिले. भटक्‍या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांनी यासाठी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT