police
police sakal
पश्चिम महाराष्ट्र

Jat Police : विक्रम ताड खुन प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

प्रशांत पाटील

भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेला महिना होत आला, तरी यातील मुख्य सूत्रधार उमेश सावंत याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

जत - भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेला महिना होत आला, तरी यातील मुख्य सूत्रधार उमेश सावंत याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ही बाब कुटुंबीयांसाठी संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे यंत्रणा न्याय देईल की नाही, अशी शंका वाटत आहे. तेव्हा हा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्यात यावा, अशी मागणी ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.

शिवाय, याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांकडेही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विक्रम ताड म्हणाले, माजी नगरसेवक विजय ताड यांचा १७ मार्च रोजी गोळ्या झाडून व दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला होता. या खुनानंतर पोलिसांनी चार संशयितांना तात्काळ अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुली देऊन सुपारी घेऊन हा खून केल्याचे सांगितले आहे. शिवाय, पहिल्या दिवशीच यात मुख्य सूत्रधार हा उमेश सावंतच असल्याचे आमचेही म्हणणे होते. त्यानुसार तपासातही स्पष्ट झाले आहे. असे असताना आज महिना झाला तरी सूत्रधार सावंत पसार आहे. यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आता बळावत आहे. एक महिना होत आला तरी पोलिसांना संशयित मिळत नाही किंवा त्या ताकदीने तपास यंत्रणा काम करत नाही.

विक्रम ताड म्हणाले, आमची अशी मागणी आहे की, पोलिसांनी त्यास सहकार्य करणारे, संबंधित राजकीय व्यक्ती, निकटवर्तीय यांची कसून चौकशी केल्यास संशयिताचा शोध ताडतीने लागू शकतो. परंतु, पोलिस यात असे काहीच करत नाहीत.

शिवाय, हा संशयित अनेक गुन्ह्यात आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ लावण्यात यावा. दरम्यान, संशयित सावंत याला अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी आठ दिवसांत त्याला अटक करू, असे सांगून आम्हास थांबवले आहे, तरी अद्याप तपास होत नाही. भलेभले आरोपी एका दिवसात पोलिसांना मिळतात. मात्र हाच मिळत नसल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजही आमचे कुटुंबीय एका दहशतीखाली वावरत आहे. त्यामुळे आता त्यास अटक न केल्यास आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, ज्याला सर्वस्वी पोलिस यंत्रणा जबाबदार असेल, असेही ताड यांनी स्पष्ट केले. यावेळी किरण शिंदे, कृष्णा कोळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bima Bharati: आधी सुपारी अन् हत्येनंतर दिली मटण पार्टी; पाच वेळच्या महिला आमदाराच्या लेकाची पळापळ

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद; BSE मार्केट कॅप प्रथमच 437 लाख कोटींच्या पुढे

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ट्विस्ट; ममता बॅनर्जींनी घेतली 'या' भाजप नेत्याची भेट

Haris Rauf Viral Video: भारतीय चाहता समजून पाकिस्तानी खेळाडू गेला अंगावर धावून मात्र... Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi Live Updates: वर्षा गायकावड यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

SCROLL FOR NEXT