
राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 ला ‘आर्यभट्ट ते गगनयान’ थीम अंतर्गत इस्रोच्या मोहिमांचा उत्सव साजरा होत आहे.
गगनयान मोहीम डिसेंबर 2025 मध्ये पहिली चाचणी प्रक्षेपित करून मानवी अंतराळ उड्डाणाला चालना देईल.
चंद्रयान 4 आणि स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचे भारताचे ध्येय अंतराळ संशोधनात नव्या उंची गाठेल.
National Space Day 2025 ISRO Missions : आज 23 ऑगस्टला भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात साजरा होत आहे. यंदाची थीम आहे ‘आर्यभट्ट ते गगनयान: प्राचीन ज्ञान ते असीम शक्यता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने देशाला संबोधित करताना भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची मोठी घोषणा केली. “आज भारत सेमी क्रायोजेनिक इंजिन अँड इलेक्ट्रिक प्रोपल्शन यासारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे.