पश्चिम महाराष्ट्र

वंचित विकास आघाडीतर्फे सांगली लोकसभेसाठी जयसिंग शेंडगे

सकाळवृत्तसेवा

सांगली - वंचित विकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून रिपब्लिकन पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात थेट उडी घेतली आहे. अर्थात त्यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर सुरू असलेल्या चर्चेसाठीच्या दबावतंत्राचा भाग म्हणून या घोषणेकडे पाहिले  जात आहे.

वसंतदादा पाटील यांचे मुंबईतील निकटचे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात तसा उशिराच प्रवेश झाला. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या श्री. शेंडगे यांच्या रूपाने धनगर समाजाला राज्यस्तरीय ओळख मिळाली. त्यांचे कनिष्ठ बंधू जयसिंगराव शेंडगे यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता वंचित बहुजन विकास आघाडी असा आहे. २००४ मध्ये त्यांनी कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणूनही लढत दिली होती. ते धनगर आरक्षणाच्या निमित्ताने ते राज्यभर सक्रिय आहेत.  जिल्ह्याच्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, मिरज पूर्व भागात धनगर समाजाचा जनाधार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT