Jaysingpur Pregnancy Test Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

Jaysingpur Pregnancy Test : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू, बनावट महिला डॉक्टरला अटक; कर्नाटक पोलिसांची कारवाई

दुधगाव येथील माहेरवाशीण महिलेचा गर्भपातावेळी महालिंगपूर (Mahalingpur) येथे मृत्यू झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) केलेल्या तपासात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचे नाव या प्रकरणात उघड झाले आहे.

सांगली : जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान (Jaysingpur Pregnancy Test) करून महालिंगपूर (जि. बागलकोट) येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी बनावट महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केल्याचे समजते आहे. कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) केलेल्या तपासात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचे नाव या प्रकरणात उघड झाले आहे.

दुधगाव येथील माहेरवाशीण महिलेचा गर्भपातावेळी महालिंगपूर (Mahalingpur) येथे मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शहरात फिरत असताना हा प्रकार सांगली पोलिसांच्या (Sangli Police) निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली. यानंतर मृत महिलेचा यांचा भाऊ आणि त्याला मदत करणारा येथील एका बनावट डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जाऊन तेथील अधिकाऱ्‍यांची भेट घेतली व गुन्हा वर्ग केला. यानंतर महालिंगपूर पोलिसांनी आणखी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तिने सोनाली यांचा गर्भपात केला होता. यावेळी प्रकृती गंभीर बनल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT