The job for state transport is eight thousand and the application is 41 thousand
The job for state transport is eight thousand and the application is 41 thousand 
पश्चिम महाराष्ट्र

राज्य परिवहनसाठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज 41 हजार !

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार 22 जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत 41 हजार 717 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज आल्याने राज्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा झाली. परंतु, बॅंकांना ढिगभर कागदपत्रे देऊनही वेळेवर पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही. दुसरीकडे सोलापूरसह अन्य दुष्काळी जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगही पुरेशा प्रमाणात आले नाहीत. मागील काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही घटल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या या भरतीसाठी अनुसूचित जमातीच्या 685 जागा आणि तीन हजार अर्ज आले आहेत. महिला उमेदवारांनी मात्र या भरतीकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे समांतर आरक्षणानुसार त्या जागांवर पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. रिक्‍तपदांसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऐजवी 22 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. 

राज्याची स्थिती : 

एकूण जागा - 8,022
अर्ज -  41,717 
महिलांसाठी जागा - 2,406 
अर्ज - 953 
अनुसूचित जमाती जागा - 685
अर्ज - 2,972



राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. मागील नोकरी भरतीवेळी 15 हजार जागांसाठी पाच लाखांपर्यंत अर्ज आले होते. आता आठ हजार जागांसाठी 40 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगारी वाढल्याने लाखो अर्ज दाखल होतात परंतु, आवश्‍यक तेवढ्याचा जागा भरल्या जातील. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT