Jotiba Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Jotiba Dongar : जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी नंदी महादेव बद्रिकेदार काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली.

सकाळ वृत्तसेवा

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी नंदी महादेव बद्रिकेदार काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली.

जोतिबा डोंगर - ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी नंदी महादेव बद्रिकेदार काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली. गर्दीमुळे आज मिनी डोंगरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा असून यामध्ये कधी चार, तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात. उद्या होळी पौर्णिमेचा सण असल्यामुळे कोल्हापूरच्या बहुतांश भाविकांनी आज पुजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी गर्दी केली होती. आज मुख्य मंदिरात पाद्यपूजा काकडआरती व मंगल पाठ झाले. त्यानंतर केदार कवच, केदार महिमा, केदार स्तोत्र या विधींचे पठण झाले.

सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा देवाची अंलकारीक महापूजा बांधण्यात आली. दुपारी बाराला धुपारती सोहळा झाला. शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे येण्यास प्रारंभ केला. डोंगर भागातील पायवाटा या गर्दीने फुलून गेल्या. चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला. आज डोंगरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड बंदोबस्ताच्या नियोजनासाठी शनिवारपासून डोंगरावर तळ ठोकून होते. आज देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी डोंगरावर येऊन पाहणी केली. रात्री भव्य पालखी सोहळा झाला.

या वेळी सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समितीचे अधीक्षक दिपक म्हेतर, सिंदिया देवस्थानचे अजित झुगर, देवसेवक ,ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते

चैत्र यात्रा ५ एप्रिलला

जोतिबा देवाची चैत्र यात्रा ५ एप्रिलला होत आहे . येत्या आठवडाभरात यात्रेच्या तयारीस सुरुवात होईल. सुरुवातीला शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, सासनकाठी प्रतिनिधी यांच्या बैठका होतील. अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT