criminals arrest by ahmednagar police crime news esakal
पश्चिम महाराष्ट्र

बनावट 'आरटीपीसीआर'वर कर्नाटक पोलिसांची करडी नजर; तिघांना अटक

निपाणी पोलिसांनी सापळा रचला

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी: कोगनोळी (Koganoli) येथील राष्ट्रीय महामार्ग कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात (Karanatak)प्रवेश करण्यासाठी बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR) तयार करुन देणाऱ्यावर निपाणी (Nipani)पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी रात्री (ता.३) बनावट रिपोर्ट आणि तिकिटाचे जादा दर आकारणाऱ्या खासगी बस चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका सुरू आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जातो. अन्यथा त्यांना परत पाठवून देण्यात येत आहे. कोल्हापूर व इतर ठिकाणच्या खाजगी बस चालकांच्याकडून बनावट रिपोर्ट तयार करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान गुरुवारी रात्री पोलिसांनी सापळा रचला. ते साध्या वेशात प्रवासी म्हणून कोल्हापूर ते हुबळी या बसमध्ये बसेल यावेळी कंडक्टरने त्यांच्याकडून रिपोर्टचे आणि तिकिटाचे एकूण सातशे रुपये आकारणी केली. यावेळी तात्काळ त्यांना अटक करण्यात आली. कारवाईमध्ये निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक आनंद केरीकट्टी, सहाय्यक उपनिरिक्षक एस ए टोलगी, अमर चंदनशिव यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT