Kavathemahankal Nagar Panchayat Newsletter: Attention to the front in the upcoming elections 
पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : आगामी निवडणुकीत आघाड्यांकडे लक्ष 

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : आगामी काही महिन्यांनंतर होणाऱ्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सत्तेचे सिंहासन असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतसाठी राजकीय आघाड्या की सोयीस्कर आघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतीच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का हा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. मिशन नगरपंचायतीसाठी आत्तापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. 


नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी आघाड्या झाल्या होत्या.मात्र गत साडेचार वर्षांच्या कालावधीत नगरपंचायतीच्या वेगवेगळ्या निवडीमध्ये अनेक वेगवेगळे राजकीय प्रयोग झाल्याचे शहरातील मतदारांनी पाहिले. सध्या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे, तर उपनगराध्यक्ष हे सगरे गटाचे आहेत. त्यामुळे सध्यातरी घोरपडे-सगरे सत्तेत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही नाराज गट खासदार पाटील यांच्या गटाशी सलगी करत असल्याचे मध्यंतरी झालेल्या सभापती निवडीत दिसून आले. शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, वाढती उपनगरे यामुळे नगरपंचायतीच्या नगरसेवकसाठी नव्या चेहऱ्याने आतापासूनच हळूहळू संपर्क ठेवण्यास सुरवात केली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी प्रभागात लक्ष देण्यास सुरवात केली असून काही महिन्यांपासून तालुक्‍यात युवा नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे आगामी नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असे चित्र आहे.

तालुक्‍याचे मुख्य केंद्र असलेल्या कवठेमहांकाळ शहरात सत्तेचे सिंहासन काबीज करण्यासाठी आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोयीस्कर आघाड्या होतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तरी होणाऱ्या आगामी निवडणुकीत कोणता राजकीय प्रयोग होणार हे पहावे लागेल.

एकंदरीतच मिशन नगरपंचायतीसाठी अंतर्गत राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नव्या चेहऱ्यांनी यांचा मिशन नगरपंचायत करण्यासाठी युवा नेत्यांशी संपर्क ठेवला असून तयारीही हळूहळू सुरू केली आहे असे चित्र दिसते. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT