Kavathemahankal Nagar Panchayat Newsletter: "Mile Sur Mera Tumhara" Karbhar 
पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : "मिले सूर मेरा तुम्हारा' कारभार

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (जि . सांगली) : शहराच्या विकासाचे सत्ताकेंद्र असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राजकीय बलाबल साधण्याची किमया सुरू झाली. नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत घोरपडे गटाला यश मिळाले. आता नगरपंचायतीत नगरसेवकांनी स्थानिक पातळीवर आपला पक्ष, आपला गट मजबूत करण्याचा विडा उचलला आहे. एकीकडे गट मजबुतीकरण करत असताना दुसरीकडे शहरातील नागरिकांनी नागरिक हक्क समिती स्थापन करून नगरपंचायतीवर मोर्चा काढून वचक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीतच कवठेमहांकाळ नगरपंचायतीत "मिले सूर मेरा तुम्हारा' असा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे.

नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी एकत्रित येत स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली व नगरपंचायतीवर सत्ता मिळविली. मात्र, आघाडीत काही वेळा बिघाड झाल्याचे चित्र गत साडेचार वर्षांच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी पाहिले आहे.

शहराच्या विकासाची भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली परंतु त्याला नगरसेवकांनी मात्र आपल्याच प्रभागात किती निधी नेता येतो याकडे लक्ष दिले. नगरपंचायतीमध्ये गत साडेचार वर्षांत वेगवेगळी राजकीय समीकरणे पहावयास मिळाली. वरिष्ठांच्या सूचनांना नगरसेवकांनी त्याला केराची टोपली दाखवली असे चित्र आहे. आपला पक्ष, आपला गट मजबूत करण्यासाठी प्रत्येक नगरसेवक झटत आहे.

सध्या नगरपंचायतीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे गट व महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या गटाकडे बलाबल असल्याचे चित्र आहे. शहर विकासाकडे दुर्लक्ष करत काही नगरसेवकांनी सोयीच्या राजकारणाची भूमिका घेतली. नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहरातील सुज्ञ नागरिकांनी सर्वपक्षीय नागरिक हक्क समिती स्थापन केली. समितीने काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीवर मोर्चा काढत विविध मागण्या केल्या. आगामी काळात नागरिक हक्क समितीची भूमिकाही शहराच्या राजकारणात महत्त्वाची दिसण्याची चिन्हे आहेत. 

नाराजीचा सूर 
शहरातील नगरपंचायतीवर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष ठेवण्याची आवश्‍यकता होती. मात्र, नेत्यांनी दिलेल्या सूचनांना नगरसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे. यामुळे नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी वरिष्ठ नेत्यांमधून एकूण कारभाराबाबत नाराजीचा सूर असल्याचे समजते. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT